आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात आणि हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही सर्दी, ताप असे आजार होत असतात. तसेच घशामध्ये इन्फेक्शन होते. यामुळे घशात वेदना, खवखव, खोकला आणि सूज येते. काही घरगुती उपाय केले तर ही समस्या दूर होऊ शकते. घशाचे इन्फेक्शन दूर करण्याच्या काही उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
लसुण
लसणाच्या ४-५ पाकळ्या तव्यावर गरम करून खाव्यात.
अद्रक
एक कप पाण्यात एक अद्रकचा लहान तुकडा उकळवा. हे पाणी कोमट झाल्यावर यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या.
दालचिनी आणि मध
एक ग्लास पाण्यात दालचिनीचा एक लहान तुकडा उकळवा. कोमट झाल्यावर यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या.
लिंबू आणि मध
एक-एक चमचा मध आणि लिंबूचा रस मिक्स करुन प्यावे.
तुळशी
तुळशीची ६-७ पाने उकळवून ते पाणी प्या. दिवसातून २ किंवा ३ वेळा असे करा.
मीठ
एक ग्लास पाण्यात एक चमचा मीठ मिसळून उकळवा. पाणी कोमट केल्यानंतर गुळण्या करा. सकाळ-संध्याकाळ हा उपाय करा.
वाफ
एका रुंद भांड्यात २ ग्लास पाणी गरम करा. यामध्ये नीलगिरी तेलाचे २-३ थेंब टाकून वाफ घ्या.