आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्दी, खोकला या सामान्य आरोग्य समस्या आहेत. यामुळे घशामध्ये खवखव होण्याचा त्रास होतो. सतत खवखव झाल्यास जेवताना, पाणी पितानाही त्रास होतो. घशामध्ये वेदना या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होतात. यामुळे सूजही येते. हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१. मध
रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे मध घ्या. त्यामुळे आराम मिळेल.
२. हर्बल चहा
मिरी, तुळस आणि लवंग यांसारखे पदार्थ घालून बनवलेला चहा घ्यावा.
३. हळदीचे दूध
हळदीचे दुध घेतल्यास गळ्याला झालेले इन्फेक्शन दूर होते.
४. मीठ, गरम पाणी
थोडे मीठ आणि गरम पाणी एकत्र करून दिवसातून दोन-तीनदा गुळणी करा.
५. लिंबू आणि गरम पाणी
एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून ते पाणी प्या.