आरोग्यनामा ऑनलाईन टीम –
१) ऑलिव्ह ऑईल :
हाताच्या साली निघत असतील तर त्यावर ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर ठरेल. ऑलिव्ह ऑईलमध्ये चांगले मॉईश्चराइजर असून ते नियमित लावल्यास ही समस्या हळूहळू दूर होईल. त्यामुळे तुमच्या हाताच्या साली जात असतील तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल लावू शकता.
२) भरपूर पाणी प्या :
हाताच्या साली जाणे ही समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीर हायट्रेड राहील. परिणामी शरीराचे डिटॉक्सिकेशन देखील होईल आणि तुमच्या हाताच्या साली जाणार नाहीत.
३) कोमट पाणी :
ज्यांच्या हाताच्या साली जात असतील त्यांनी कोमट पाण्यात काही वेळ हात बुडवून ठेवा. त्यामुळे हाताची त्वचा नरम पडेल व त्यानंतर ते स्वच्छ पुसून त्यावर मॉईश्चराइजर लावा. मॉईश्चराइजरने त्वचा हायट्रेड राहील.
४) दूध आणि काकडीचा वापर :
तुमच्या हाताची जर वारंवार साल निघत असल्यास त्यावर दूध आणि काकडीचा तुकड्याने मसाज करा. काकडीत पाण्याचा अंश अधिक असल्याने त्वचा मॉईश्चराइज होते. आणि दुधातील स्निग्धता त्वचेला तजेला, आर्द्रता देते.
५) प्रोटीनयुक्त आहार :
त्वचेच्या साली निघतात तेव्हा अनेक टिश्यू नष्ट होतात. त्यामुळे त्याचा पूर्ननिर्मितीसाठी आहारात प्रोटीन्सचा समावेश करा.जेणेकरून तुमच्या हाताच्या साली जाणार नाहीत.