काकडीने करा झुरळांचा नायनाट, जाणून घ्या ‘हा’ अनोखा फंडा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झुरळ अतिशय घाणेरडा जीव आहे. अनेकांना त्याला पाहूनही किळस वाटते. घरात झुरळे असल्यास विविध आजार पसरण्याची शक्यता असते. यांचा नायनाट करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत. झुरळांचा नायनाट करण्यासाठी कधीही केमिकलचा वापर करू नका. याचे काही दुष्परिणाम आपल्यावरही होत असतात. यासाठी काही नैसर्गिक उपाय असून ते नक्की करून पहा.

हे उपाय करा

* घरात ज्याठिकाणी झुरळांचे वास्तव्य असेल तेथे काकडीचा एक तुकडा ठेवा. काकडीचा वास झुरळांना पळवून लावण्यासाठी पुरेसा आहे.

* झुरळांचा नायनाट करण्यासाठी दोन मोठे चमचे बोरिक पाउडर आणि दोन मोठे चमचे गव्हाचे पीठ दुधामध्ये मिसळून तिंबून घ्या. या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या करून झुरळ असतील त्या ठिकाणी ठेवा. या उपायाने झुरळांपासून मुक्ती मिळेल.

* लवंग झुरळांचा नायनाट करू शकते. किचनच्या बेसिनमध्ये थोडीशी लवंग ठेवल्यास बेसिनमध्ये झुरळ दिसणार नाहीत.