थंडीच्या दिवसातही ओठ गुलाबी, सुंदर राहण्यासाठी ‘हे’ ६ उपाय, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थंडीच्या दिवसात ओठ सतत फाटतात किंवा ओठांना चीर पडते. अशावेळी काही सौंदर्य प्रसाधने वापरल्याने ओठांचे सौंदर्य नष्ट होते. काहीजण वॅसलीन किंवा लीप जेलचा वापर करतात. यामुळे ओठ काही काळासाठी नरम आणि सुंदर होतात. परंतु ओठ दिवसभर सुंदर दिसण्यासाठी आणि नरम राहण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते आपण जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ ) विलायची बारीक करून लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळेस लावल्यास ओठ नरम होतील. रात्री झोपताना ओठांना बदाम तेल लावा. दही, लोणी यात केसर मिसळून ओठांना लावल्याने ओठ गुलाबी होतात.
२ ) ओठ जास्त प्रमाणात फाटले असेतील तर टमाट्याच्या रसामध्ये तूप किंवा लोणी मिसळून ओठांवर लावावे. ओठ पूर्ववत होईपर्यंत हा उपाय करा.
३ ) लिंबाचा रस आणि मध एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण एक तासभर ओठांना लावून ठेवा. त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून कमीत कमी दोन वेळेस हे मिश्रण ओठांवर लावा.
४ ) रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धवून घ्या. त्यानंतर ओठांवर दुधाची साय, लोणी, किंवा तुपाने हलक्या हाताने मालिश करा. या उपायाने ओठ नरम आणि सुंदर राहतील.
५ ) प्रत्येक ऋतूमध्ये ओठ सुंदर आणि नरम ठेवण्यासाठी देशी गुलाबाच्या पाण्यात भिजवलेल्या काही पाकळ्या दररोज ओठांवर रगडा. या उपायने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील.
६ ) मोहरीचे तेल किंचित गरम करून रात्री झोपताना नाभीवर लावा. हा आयुर्वेदिक उपाय अतिशय चमत्कारी आहे. १२ तासात परिणाम दिसतात.
Comments are closed.