आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मायग्रेन या डोकेदुखीच्या आजारात रूग्णाला भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. या वेदना डोक्यासह कपाळ, जबडा आणि सायनसलाही होतात. हा त्रास कमी करण्यासाठी काही उपाय आहेत. हे उपाय केल्यस मायग्रेनचा त्रास नियंत्रित होण्यास मदत होते. शिवाय हे उपाय घरगुती पदार्थ वापरून करता येत असल्याने ते सहज करता येऊ शकतात. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, आणि कसे करावेत याविषयी आपण माहिती घेवूयात.
मायग्रेनचा त्रास होत असल्यास बर्फाचे काही तुकडे टॉवेलमध्ये ठेवून शेकल्यानेही रूग्णास आराम पडतो. मात्र, गारवा सहन होईल तोपर्यंतच बर्फाने शेकावे. अधिक चिंता किंवा तणाव हे मायग्रेनचे मुख्य कारण आहे. असा त्रास होत असल्यास रूग्णास जेव्हा तीव्र वेदना होत असतील तेव्हा कोमट पाण्याने अंघोळ करावी. यामुळे शरीराच्या सर्व इंद्रियांची सक्रियता वाढते. यामुळे तरतरीत राहाल आणि वेदनाही कमी होतील.
तज्ज्ञ सांगतात की, मायग्रेनचा त्रास नियंत्रित करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर बळकट असले पाहिजे. पीडिताचे डोळे, मान आणि खांद्याचे स्नायू स्ट्रेस्ड होतात, त्यामुळे मान आणि खांद्याची स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे. तसेच संगणकावर काम करताना अधून-मधून ब्रेक घेत राहावा. दोन-तीन तासांच्या अंतराने १५ मिनिटे दीर्घ श्वास घ्यावा, जेणेकरून तुम्ही रिलॅक्स व्हाल. हर्बल टीचे सेवन करणे मायग्रेनसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले आले, तुळस, पुदिना यासारखे नैसर्गिक घटक चिंतेपासून मुक्ती मिळणे आणि स्नायूंना तणावरहित करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच कॅफिनपासून दूर राहावे, कारण यामुळे रक्तदाब आणि मायग्रेनच्या वेदना आणखी वाढू शकतात.