आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामेच्छा वाढवून शरीरसुखाचा आनंद घेतल्यास जीवन आनंददायी होते. अशाप्रकारे कामेच्छा वाढवून जीवन आनंदी करण्यासाठी या दहा सुपर फूडविषयी जाणून घ्या. शिवाय पदार्थ अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. केवळ याचा वापर नियमित केला पाहिजे.
लसणामुळे कामेच्छा वाढविण्यासाठी उपयोग होतो. प्रणयामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर आहे. रोज सकाळी लसणाच्या २-३ पाकळ्या चावून खाल्ल्याने फायदा होतो. तसेच आयुर्वेदानुसार शरीरासाठी आणि प्रणयक्रीडेतील सुखासाठी खडीसाखर उत्तम आहे. खडीसाखर आरोग्यासाठी पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी आहे.
स्ट्रॉबेरी सुद्धा कामेच्छा वाढविण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट असल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची वृद्धी होते. डार्क चॉकलेटसोबत स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास कामेच्छेमध्ये वृद्धी होऊन मूड चांगला होतो.अॅवकोडा या फळात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर आहे. यामुळे हे फळ हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफ सुद्धा उत्तम बनवते. तसेच डाळिंब देखील उपयोगी आहे. डाळिंबा चा ज्यूस नियमित घेतल्यास सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
डाळिंबाच्या ज्यूसमुळे कामेच्छा वाढवणारा टेस्टास्टेरॉन हॉमोन्स उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होतो. तसेच स्मरणशक्ती वाढते. मूडही चांगला राहतो. तसेच बदामही कामेच्छा वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक पोषक तत्व असतात. यामुळे कामेच्छा वाढते आणि आरोग्यावृद्धी होते. तसेच बदामाच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. रताळेदेखील कामेच्छा वाढविण्यासाठी उपयोगी आहे. शिवाय यातील पोटॅशियम, बीटा कॅरोटीन यासारखे तत्व ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेवून कामेच्छा वाढविण्यास मदत करतात.