• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

by Nagesh Suryawanshi
June 8, 2019
in माझं आराेग्य
0
उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन : उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास असह्य होतो. कडक उन आणि आद्र्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. यापासून त्रासपासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास घामोळ्यांचा त्रास आपोआपच कमी शकतो.
घामोळ्यांमुळे त्रास होत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्यावीत आणि ते पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करावी. यामुळे घामोळ्या लवकर दूर होतील.

चंदन पावडर लावल्यानेही घामोळ्या दूर होतील. पावडरप्रमाणे शरीरावर लावावे. चंदन पावडर पाण्यात घोळून याचा लेप घामोळ्यांवर लावू शकता. शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी उपयोगी आहे. घामोळ्यांपासून बचावाचा हा चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाका आणि या पाण्यात काकडीचे पातळ तुकडे कापून टाकावेत. यानंतर हे तुकडे घामोळ्यांच्या जागेवर लावल्याने घामोळ्या लवकर बऱ्या होतात.

घामोळ्यांवर मुलतानी मातीचा लेप लावल्यानेही आराम मिळतो. यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून त्याचा लेप तयार करावा. हा उपाय केल्यास घामोळ्यांमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते. कोरफडीच्या पानांचा लेप दिवसातून दोनवेळा घामोळ्यांवर लावल्यानेही फायदा होतो. लहान बाळाला घामोळ्या झाल्यास त्याची अंघोळ घातल्यानंतर टॉवेलऐवजी हवेद्वारे त्याची त्वचा वाळू द्या. बाळाला कॉटन किंवा मखमलीचे हलके कपडे घाला.

यामुळे घामोळ्या बऱ्या होतात. आणखी एक उपाय म्हणजे कच्च्या आंब्याचा आहे. हा उपाय करण्यासाठी कच्चा आंबा मंद आचेवर भाजून घ्यावा व त्यातील गर काढून तो शरीरावर लेपासारखा लावावा. हा उपाय केल्यास घामोळ्या दूर होतील. कच्चा आंबा शरीराची उष्णता थंड करण्यामध्ये लाभदायक आहे. खोबरेल तेलात कापूर मिसळून घामोळ्यांवर लावल्यास चांगला अराम पडतो.

Tags: arogyanamaBodyhealthSkinSummerआरोग्यआरोग्यनामाउन्हाळाकडुनिंबघरगुती उपायघामोळ्यात्वचाशरीर
Previous Post

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय

Next Post

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

Next Post
अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

coconut pasta
Food

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

by omkar
February 27, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- केरळ स्टाईल नारळी मिल्क स्ट्यू पास्ता रेसिपी (Coconut Pasta Recipe) एक मधुर आणि ओठांवर चव सोडणारी पास्ता रेसिपी...

Read more
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
bad breath

तोंडाचा घाण वास कसा टाळावा ?, जाणून घ्या

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.