निरोगी शरीर आणि ताकदीसाठी ‘या’ ७ खास भाज्या, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलेल्या जीवनशैलीमुळे आता आयुष्यमान ६० ते ६५ वर्षांचे झाले आहे. निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेली पोषक तत्व शरीराला मिळत नसल्याने असे होत आहे. चुकीची आहार पद्धाती, तसचे प्रदुषण, आहाराच्या नावावर कृत्रिम रंगाने रंगवलेल्या भाज्या आणि फास्ट फूड यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. निरोगी राहण्यासाठी काही खास भाज्या असून त्यांची माहिती आपण करून घेणार आहोत.
शेवगा
काही आदिवासी शेवग्याच्या झाडाच्या पानांची चटणी करून खातात. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असते. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिने असतात. याच्या सेवनाने पचनक्रियेशी संबंधित आजार नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो. शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. पोटातील अल्सरसाठी लाभदायक असून यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.
तोंडले
तोंडल्यामध्ये कॅरोटीन व्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असते. अर्धेकच्चे तोंडले काही दिवस खाल्ल्यास चष्मा जातो. तोंडले काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहे.
कोबी
लहान मुलांसाठी पत्ता कोबीचे सेवन गुणकारी आहे. ८ ते १० महिने वयाच्या कमी वजनाच्या मुलांना अर्धा ते एक कप पत्ता कोबीचा रस प्यायला दिल्यास वजन वाढते. कोबीची पाने गोड, शीतल, मूत्रल व कृमिनाशक आहेत. पोटदुखी, त्वचाविकार, दमा व ताप यावर कोबीची पान गुणकारी आहेत. हिरड्याच्या रोगावर कच्ची पाने चघळावीत.
दोडका
दोडक्याची चटणी तापात गुणकारी ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा २-३ थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या उपायाने कावीळ लवकर बरी होते. दोडक्यामध्ये इन्सुलिनप्रमाणे पेप्टाईड्स आढळून येतात, यामुळे मधुमेहावर नियंत्रणात राहतो.
बीट
यामधील अँटीऑक्सिडेंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात. बीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. पांढरे बीट पाण्यात उकडवून हे पाणी फोड, जळजळ आणि तोंड येणे यासाठी उपयुक्त आहे. तारुण्य टिकवायचे असल्यास बीटचे नियमित सेवन करावे.
पालक
पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अॅमिनो अॅसिड असते. कच्चा पालक फार गुणकारी आहे. पचनक्रिया, खोकला आणि फुफ्फुसावर आलेली सूज, दृष्टीदोष स्मरणशक्ती यावर पालक गुणकारी आहे.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपेन हे अॅन्टीऑग्झिटंट असते. यामुळे शरीराची झीज रोखली जाते. तारुण्याचे रक्षण होते. नियमित टोमॅटो खाल्ल्यास त्वचा आणि केस तजेलदार होतात. मधुमेहाच्या रुग्णामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण समतोल राखण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त आहे. थकवा दूर करण्यासाठी टोमॅटो उपयुक्त आहे.
Comments are closed.