अनेकजण डोकेदुखी सुरू झाल्यावर पेनकिलर खातात. मात्र, याचे साईड इफेक्ट होतात. परंतु, घरगुती उपाय केल्याने रिअॅक्शनची भिती नसते. डोकेदूखीचा त्रास असल्यास घरगुती उपाय करणे योग्य ठरते. घरात उपलब्ध अनेक पदार्थांचा वापर करून हे उपाय करता येतात. शिवाय, या रामबाण उपायांनी डोकेदुखीमध्ये त्वरीत आराम पडतो. डोकेदुखीवरील हे रामबाण उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत रामबाण उपाय
* केशर आणि बदामाची पूड तयार करून वास घेतल्याने किंवा डोक्यावर लावण्याने फायदा होतो.
* जायफळ दूधात मिसळून डोक्यावर लावल्यास डोकेदूखी कमी होते.
* सर्दीमुळे डोके दूखत असेल तर कांद्याचा वास घ्यावा किंवा कांद्याचा रस डोक्यावर लावावा.
* थंड पाण्याची धार डोक्यावर सोडल्यानेही डोकेदूखी कमी होते.
* चंदनामध्ये पुदिना मिसळून डोक्यावर लावल्याने उन्हामुळे होणारी डोकेदूखी कमी होते.
* पुदिन्याचे तेल लावल्यानेही डोकेदूखी कमी होते.
* खोबरेल तेलाने १०-१५ मिनिटे मसाज केल्यानेही डोकेदूखी कमी होते. खोबरेल तेलाने डोके थंड होते आणि डोकेदूखी कमी होते.
* लसणाची एक पाकळी घेऊन त्याचा रस प्यायल्याने डोकेदूखी लगेचच कमी होते.
* सतत डोकेदूखी असल्यास सफरचंदावर मिठ टाकून खावे. त्यानंतर गरम दूध प्यावे. हा उपाय नियमित १० दिवस केल्याने डोकेदूखीच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
* बदाम तेलाने मालिश केल्यानेही डोकेदूखी कमी होते.
* भोपळ्याच्या कोळाचा लेप लावल्याने लगेचच आराम मिळतो.
* लिंबू, आलूबूखार किंवा चिंचेचे सरबत प्यायल्यानेही डोकेदूखीत आराम मिळतो.
* सुंठपावडर पाण्यात मिसळून हा लेप डोक्यावर लावापर. थोडी आग होते परंतु, डोकेदूखी लगेचच थांबते.
* लवंगमध्ये मिठ मिसळून पावडर बनवा. ही पावडर बरणीत भरून ठेवा. डोकेदूखीत कच्च्या दूधात याची पेस्ट डोक्यावर लेप लावा. यामुळे काही वेळातच डोकेदूखी थांबते.
* एक ग्लास पाण्यात अध्र्या लिंबाचा रस टाकून प्यायल्याने वायूमुळे होणारी डोकेदूखी कमी होते.
* सततच्या डोकेदूखीचा त्रास असल्यास रोज एक ग्लास गायीचे दूध प्यावे.
* दालचिनीची पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट डोक्यावर लावल्याने आराम मिळतो.
* सर्दीमुळे ड़ोके दूखत असल्यास धन्याची पुड आणि साखर मिसळून खाल्ल्याने आराम मिळतो.
* उन्हामुळे डोके दूखत असेल तर चंदन पावडरची पेस्ट करून डोक्यावर लावल्याने फायदा होतो.