आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस गळणे ही समस्या अनेकांना सतावत असते. केस गळतीची कारणे विविध असतात. मात्र, काही घरगुती उपाय करून केसगळती थांबवता येणे सहज शक्य आहे. आपल्या घरातीलच उपलब्ध पदार्थांचा वापर करून हे सोपे उपाय करता येतात. शिवाय हे उपाय चटकन करता येतात.
हे घरगुती उपाय करा
* झेंडूचे फुल बारीक करून त्याचा रस काढा. हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
* शिकाकाईच्या बीयामध्ये थोडे पाणी टाका व बारिक करून घ्या. रात्रभर पेस्ट थंड असेलल्या ठिकाणी ठेवा. सकाळी हे पेस्ट केसाला लावा. नंतर केस स्वच्छ करा.
* आहारात मेथीच्या भाजीचा वापर जास्तीत-जास्त केल्या नंतर आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी याचे पेस्ट तयार करा. हे पेस्ट केसाला लावल्यांनतर केस गळती थांबते.
* जटामांसी या वनस्पतीला नारळाच्या तेलामध्ये उकळा. थंड झाल्यानंतर तेल बॉटलमध्ये भरून ठेवा. रोज रात्री हे तेल डोक्याला लावल्यानंतर केस गळणार नाहीत.
* मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेल टाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्या जागेवर लावल्यानंतर केस उगवायला सुरूवात होते.
* आवळ्याचे चुर्ण तयार करा. चुर्ण दह्यात मिसळून घ्या. आवळा आणि दह्याचे पेस्ट तयार करून केसाच्या मुळाला हे पेस्ट लावा. एक तासानंतर केस स्वच्छ करा.
* दोन लीटर पाण्यामध्ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्याने आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)