आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावर मुरूम, पुरळ, डाग, कमी वयात पडलेल्या सुरकुत्या, या सर्व सौंदर्य समस्यांवर काही नैसर्गिक पद्धतीचे उपचार करता येतात. दोन टोमॅटो बारीक करून त्यामध्ये तीन चमचे दही आणि दोन चमचे गव्हाचे पीठ टाकावे. चेहऱ्यावर हे मिश्रण कमीतकमी २० मिनिटे लावून ठेवल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. हा उपाय आठड्यातून दोन वेळेस करावा.
कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर एक सफरचंद बारीक करून घ्यावे आणि त्यामध्ये थोड्या प्रमाणात दुध टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर थोडावेळ लावून त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून चार वेळेस हा उपाय केल्यास फायदा होईल. अर्धा कप पत्ताकोबीच्या रसामध्ये अर्धा चमचा दही आणि १ चमचा मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. थोड्यावेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय केल्यास त्वचा मुलायम होते.
रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या दोन चमचे रसामध्ये २ चमचे मध मिसळून हे मिश्रण २० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. थोड्यावेळाने स्वच्छ कापूस दुधामध्ये ओला करून चेहरा पुसून घ्या. दररोज हा उपाय केल्यास फरक पडतो.
एक बटाटा बारीक करून त्यामध्ये २-३ चमचे कच्चे दुध मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट दररोज सकाळ-संध्याकाळ चेहऱ्यावरील काळ्या डागांवर थोडावेळ लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. थोड्याच दिवसात काळे डाग नष्ट होतील. विड्याचे एक पान बारीक कुटून घ्यावे आणि त्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचे तेल टाकावे. हे मिश्रण चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, पुरळ असलेल्यास ठिकाणी लावावे. आठवड्यातून कमीतकमी २-३ वेळेस हा उपाय केल्यास चांगला फायदा होतो.