तांदूळ आणि दूध अशाप्रकारे लावल्यास उजळ दिसेल चेहरा, करून पहा

beuty-2

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुंदर त्वचा प्रत्येक स्त्रीला हवी असते. यासाठी स्त्रीया ब्युटी पार्लरमध्येही वारंवार जात असतात. तसेच बाजारातील विविध प्रॉडक्टही वापरतात. मात्र, या प्रॉडक्टचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. सुकलेला चेहरा कोणत्याही स्त्रीला आवडत नाही. यासाठी अन्य कोणतेही उपाय करण्यापेक्षा खास घरगुती उपाय करावेत. त्वचा स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्यासाठी स्क्रब आवश्यक असते. याच्या सहाय्याने मृतपेशी निघून जातात आणि त्वचा चमकते, उजळ होते. सुंदर त्वचेसाठी काही खास घरगुती स्क्रब आणि फेसपॅकची माहिती करून घेवूयात.

हे स्क्रब वापरून बघा

* तांदूळ आणि तीळ सम प्रमाणात घेऊन रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे सर्व बारीक करून चेहरा आणि शरीरावर काहीकाळ लावून ठेवा. काही वेळानंतर थंड पाण्याने त्वचा धुवून घ्या. तिळामुळे तुमची त्वचा नरम होईल आणि तांदळामुळे त्वचेवरील डेड स्किन नष्ट होईल. या उपायाने चेहरा आणि संपूर्ण शरीराची त्वचा उजळेल.

* रात्री झोपण्यापूर्वी लो फॅट असणारे दुध लावा. या दुधाने हलक्या हाताने १५ – २० मिनिट मालिश करा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चेहरा माइल्ड फेश वॉशने स्वच्छ करा.

* मध आणि मुलतानी मातीची पेस्ट करून लावा. हा फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर नाइट क्रीम लावून सकाळी त्वचा स्क्रब आणि फेसवॉशने स्वच्छ करा.

* चमकदार त्वचेसाठी डोळ्याखालील डार्क सर्कलसुद्धा नष्ट करणे गरजेचे असते. डोळ्याजवळील या त्वचेवर कच्च्या बटाट्याच्या स्लाइसने मालिश करा. काही दिवसात डार्क सर्कल नष्ट होतील.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)