आरोग्यनामा ऑनलाइन – त्वचेची निगा राखण्यासाठी नेहमी नैसर्गिक उपाय केले पाहिजेत. बाजारातील उत्पादनांमुळे त्वचेचे नुकसान होते. पारंपारिक आयुर्वेदिक उपायांमुळे त्वचा तजेलदार, उजळ होते. यासाठी काही घरघुती फेसपॅक असून ते कसे तयार करावेत याची माहिती आपण घेणार आहोत.
१ बटाटा, दही फेसपॅक
एक बटाटा बारीक करून त्यामध्ये दही मिसळा. हा लेप चेहरा, मानेवर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळते.
२ हळद, मध फेसपॅक
मध आणि हळदीमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळा. त्यानंतर ही पेस्ट लावून, थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे सुरकुत्या नष्ट होतात.
३ हळद, दही फेसपॅक
एक चमचा हळदीमध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे काळेपणा दूर होईल. त्वचा उजळ दिसेल.
गाजर फेसपॅक
दोन गाजर बारीक करून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा मध टाकून हे मिश्रण १५ मिनिट लावून ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल आणि चमकदार होते.
हळद, चंदन फेसपॅक
हळद, चंदनामध्ये दुधाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट लावून २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १० मिनिट पेस्ट तशीच ठेवा. थोड्यावेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळतो.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या