पाय मुरगळलाय? ‘हा’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खेळताना, चालताना अथवा धावताना अचानक पाय मुरगळतो. यामुळे खूप वेदनाही होतात. अशावेळी काय करायचे हे सूचत नाही. मात्र, हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपचार केल्याने आराम मिळू शकतो. दुखणारा भाग बर्फाने शेकल्यास सूज, दुखणे आणि लचक आली असल्यास आराम मिळतो. यासाठी बर्फाच्या तुकड्यांना टॉवेलमध्ये किंवा जाड कपड्यात बांधून दुखऱ्या जागेवर १० ते १५ मिनिटे ठेवावे.
तसेच दुसरा उपाय म्हणजे सूज वाढणे थांबवण्यासाठी मुरगळलेल्या भागाला कापडाचे बँडेज करावे. यामुळे मुरगळण्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होऊन सूजही उतरत. आणखी एक उपाय म्हणजे हळद लावणे. हळद वेदनाशामक असल्यामुळे ती तुमच्या प्रत्येक वेदनेला दूर करते. यासाठी तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. चुना आणि पाणी एकत्र करूनही लावू शकता. तसेच लसूण आणि तेलाचा उपाय केल्यासही मुरगळल्यावर आराम मिळू शकतो. यासाठी लसणाचे तेल काढून त्यात नारळाचे किंवा बदामाचे तेल मिसळा. आता या मिश्रणाला कोमट तापवा आिण मुरगळलेल्या जागेवर लावा. असे दिवसातून २-३ वेळा करा. दुखणे आणि सूज दोन्हीत आराम मिळतो.