फूड पॉयझनिंगवर घरगुती उपाय
* एक छोटा चमचा मेथीदाणे अर्धा कप पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. अर्धा तासानंतर पाणी गाळून मेथीदाणे थोडे-थोडे घेऊन दिवसभरात खावेत. या उपायाने फूड पॉयझनिंगची समस्या दूर होते.
* ब्लॅक टी आणि ग्रीन टी प्यायल्याने आराम मिळतो. यामधील अँटी-ऑक्सीडेंट तत्त्व शरीरातील विषारी तत्त्व बाहेर काढतात.
* अद्रक नैसर्गिक अँटी-बायोटिक असून ते फूड पॉयझनिंगवर रामबाण औषध आहे. अद्रक चहामध्ये टाकूनही घेता येते.
* लिंबामध्ये विविध अॅसिडमुळे अन्न लवकर पचन होते. लिंबामुळे पोटातील बॅक्टीरिया नष्ट होतात. यामुळे फूड पॉयझनिंग झाल्यास लिंबूपाणी प्यावे.
* तुळशीची पाने टाकलेला चहा घ्यावा. तसेच तुळशीच्या पानांचा रस सेवन केल्यास फूड पॉयझनिंगची समस्या दूर होते.
* एक चमचा भाजलेले जिरे खाल्ल्यास फूड पॉयझनिंगमध्ये त्वरित आराम मिळतो.
* डाळींबाचा रस पोटाच्या समस्यांसाठी सर्वात उपयुक्त औषध आहे.
* फूड पॉयझनिंगमुळे आलेली कमजोरी दूर करण्यात ब्राऊन शुगर हे रामबाण औषध आहे. एक चमचा ब्राऊन शुगर खाल्ल्यास शरीराला उर्जा मिळते.
* दही खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या लकवर दूर होते.
* फूड पॉयझनिंग झाल्यानंतर अर्धा कप कोरफडीचा रस घ्यावा.
* एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घेतल्यास लवकर आराम मिळतो.