आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांना पुरळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. पण काहींच्या त्वचेवर खाज येणारी पुरळ येते. आणि हे खूप त्रासदायक असते. त्यामुळे त्यांना यावर काय उपाय करावा तेच कळत नाही. पण आपण खाज येणाऱ्या पुरळीसाठी काय उपचार करावेत हे आज जाणून घेणार आहोत.
१) समुद्राच्या पाण्याने अंघोळ केल्याने एक्जिमाच्या रुग्णाला फायदा होतो.
२) कडूलिंबाची पाने पाण्यात घालून उकळवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. डाळिंबाच्या पानांची पेस्ट लावा.
३) केळ्याच्या गरात लिंबाचा रस घालून ते मिश्रण खाज येणाऱ्या जागी लावा. किसलेल्या गाजरात सेंधव मीठ घाला आणि ते कोमट करून त्या जागी लावा. कच्च्या बटाट्याचा रस लावा.
४) सिंगाडात लिंबाचा रस घालून लावा. हळदीचा लेप लावणेही फायदेशीर ठरेल.
५) ओवा पाण्यात उकळवा आणि त्या पाण्याने ती जागा धुवा. कडूलिंबाचा रस प्या.
६) दूधात गुलकंद घालून प्या. कडूलिंबाची पाने वाटून त्यात दही घालून ती पेस्ट खाज येणाऱ्या जागी लावा.
७) झेंडूची पाने पाण्यात उकळवून त्याची पेस्ट लावणे देखील उपयुक्त ठरेल.