आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान-मोठा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून औषध आणून घेतले जाते. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. अशा लहान-मोठ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही परंपरागत घरगुती उपाय करता येतात. हे उपाय कोणते आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत उपाय
* रक्तदाब सामान्य राहण्यासाठी सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या पाण्यासोबत चावून खाव्यात. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा.
* एक चमचा मेथी दाणे चिमूटभर हिंगात मिसळून पाण्यासोबत सेवन केल्यास पोटदुखी थांबते.
* हवळीचे दाणे वाटून त्यामध्ये गायीचे तूप मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावरील पांढऱ्या डागांवर लावावी. डाग कमी होतील.
* अरबी वाटून त्याची पेस्ट मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावल्यास दुखणे आणि सूज दोन्ही कमी होते.
* चार चमचे ओव्याला एक ग्लास पाण्यात २० मिनिटे मंद आचेवर उकळवून थंड करावे. हे पाणी पिल्याने पोटातील आजारात आराम मिळतो.
* दहा ग्रॅम नारळाचा कीस, खसखस आणि चंदन अर्धा ग्लास पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी गाळून प्यावे. अँसिडिटी कमी होते.
* रात्री मोठे धणे पाण्यात भिजवून हे पाणी सकाळी उठून प्यावे. धणे चावून खावेत. यामुळे कोलेस्टेरॉल पातळी कमी होते.
* खोकला लागल्यास विड्याच्या पानात ओवा टाकून चावावे. दोन ते तीन दिवसात खोकला बरा होतो.
* अल्सरचा त्रास असल्यास बदाम वाटून ठेवावे. सकाळ-संध्याकाळ दुधात मिसळून पिल्याने अल्सर बरा होतो.
* रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी दोन पाकळ्या लसूण खावा.
* मुतखड्याचा त्रास असल्यास कांद्याच्या रसात साखर मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मुतखडा तुटून नैसर्गिकरीत्या बाहेर पडतो.
* कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगामध्ये लवंग वाटून चंदनासोबत त्याचा लेप लावावा.
* अतिसारात भात खावा. भात आतड्यांचा वेग कमी करून जुलाब थांबवतो. त्यामुळे भाताचे सेवन केल्यास आराम मिळतो.
* खोल जखमेमुळे शरीरावर पडणारे डाग कमी करण्यासाठी त्या जागेवर कच्चे बटाटे वाटून लावावे. डाग नाहीसे होतात.
* जवसाचे दाणे मंद आचेवर भाजून त्यात खडीसाखर मिसळून वाटून घ्यावे. ही पावडर गरम पाण्यासोबत पिल्याने कफ कमी होतो.
* ३० ग्रॅम चिंच एक ग्लास पाण्यात मिसळून हा रस प्यावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरमे, फोड लवकर बरे होतात.
* मटारचे दाणे भाजून यात चंदन पावडर आणि थोडेसे दूध मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट आठवड्यातून तीन दिवस लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.
* दोन केळी कुस्करून त्यात दोन चमचे मध टाकावी. ही पेस्ट रूक्ष त्वचेवर लावल्यास त्वचेचा रूक्षपणा कमी होतो.
* दोन चमचे आवळ्याची पावडर घ्यावी. त्यामध्ये एक चमचा मध मिसळावी. या पेस्टचे दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने श्वासाचा त्रास कमी होतो.
* चार चमचे खोबरेल तेल गरम करून त्यात एक कापूर वडी टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण डोक्यावर लावल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो.
* दररोज सकाळी तुळशीची पाच पाने आणि लिंबाची दोन पाने चावून खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
* आवळ्याचा आंबट किंवा गोड मुरब्बा तयार दररोज सकाळी पाण्यासोबत घ्यावा. रक्त स्वच्छ होते.