आरोग्यानामा ऑनलाईन टीम – वातावरणात गारवा वाढल्यास काही जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. असा त्रास होत असल्यास योग्य ती काळजी घेतली पाहिजे. यासाठी काही घरगुती उपाय केल्यास चांगला फरक जाणवतो. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
* नाक सर्दीमुळे बंद झाले असेल तर, दालचीनी, कालीमिर्च, इलायची आणि जिरे एकत्र करून एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल.
* १० ग्रॅम लसुन १ कप दूधात १/२ कप होईपर्यंत उकळावे. हे उकळेळे दूध संध्याकाळी झोपण्याआधी घ्यावे.
* सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीची पाने चाऊन खाणे अथवा पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून प्यावा.
* काळी मिरी जाळून त्याचा धूराचा श्वास घेतल्यास बंद नाक मोकळे होण्यास मदत होते.
* एक ग्लास गरम पाण्यात लिंबाच्या रसासोबत एक चमचा मध एकत्र करावे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
* १ चमचा कांद्याचा रस आणि मध योग्य प्रमाणात एकत्र करून दिवसातून तीन वेळेस घेतल्याने आराम मिळतो.
* मधासोबतच आले सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून लवकर आराम मिळतो.
* गरम दूधात एक चमचा हळद टाकून पिल्यास कफ कमी होतो.
* भेंडीचा ५० मिली काढा दिवसातून ३ वेळेस घेतल्याने घशातील खवखव आणि कोरडा खोकल्यापासून आराम मिळतो.
* खजूर दूधासोबत उकळून पिल्यास थंडीच्या काळात आराम मिळतो.
* एक ग्लास गरम पाण्यामध्ये चिमूटभर मीठ, चिमुटभर खाण्याचा सोडा एकत्र करून दिवसातून दोनदा आणि झोपण्यापूर्वी या पाण्याने गुळणा केल्याने घशामधील खवखव कमी होण्यास मदत होते.
* हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.
* थोडे आले, ओवा १ चमचा, लवंग ५, काळी मिर्ची ३, मेथी १ चमचा, तुळस आणि पुदीना पाने १० या सर्वांचा काढा बनवावा त्यामध्ये साखर टाकून दिवसातून दोनदा आराम मिळेपर्यंत घ्यावे.
* किसमिसची पेस्ट करून थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.
* आल्याच्या तुकड्यांचा काढा २० मिली ते ३० मिली दिवसभरातून ३ वेळेस घेतल्यास सर्दीच्या त्रासापासून आराम मिळतो.