आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने विविध गंभीर आजार होतात. हे आजार टाळण्यासाठी कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यानंतर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध प्रकारची औषधे घेतली जातात. या औषधांचे विविध दुष्परिणाम शरीरवर होऊ शकतात. म्हणून अशी औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे चांगले असते. या नैसर्गिक पद्धती कोणत्या आहेत, याविषयी आपण माहिती करून घेऊयात.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसुन-कांदा एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो. जर तुम्ही योग्य प्रमाणात लसुन-कांद्याचे सेवन करत असाल तर कोलेस्टेरॉल कधीही नियंत्रणा बाहेर जाणार नाही. ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असलेले खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास ट्रायग्लिसराइडच्या निर्मितीपासून बचाव होऊ शकतो. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर नेहमी नियंत्रणात राहतो.
कोलेस्टेरॉलची समस्या दूर करण्यात हळद एक रामबाण उपाय आहे. ज्या लोकांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली आहे, अशा लोकांनी हळदीचे जास्त प्रमाणात सेवन करावे. दररोज शेंगदाणे खाल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवणे शक्य आहे. एक मुठभर शेंगदाणे खाल्यास शरीराला उर्जा मिळते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. परंतु दररोज एक मुठपेक्षा जास्त शेंगदाणे खाऊ नयेत, कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.