‘हे’ घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॅक्टेरिया किंवा यीस्टमुळे नाभीमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. कोणत्याही वयात हा संसर्ग होऊ शकतो. यामुळे नाभीमध्ये सूज, लालसरपणा, वेदना, हिरव्या किंवा राखाडी प्रदररासारखी समस्या होते. घरातील काही उपाय आठवड्यातून २-३ वेळा केल्यास नाभीचा संसर्ग दूर होतो. नाभीचा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय करता येऊ शकतात. या उपयांबाबत जाणून घेऊयात.
आठवड्यातून २-३ वेळा एलोवेरा जेल नाभीवर लावल्यास यामधील अँटी बॅक्टेरियल तत्त्व संसर्गापासून बचाव करतात. तसेच अर्धा-अर्धा चमचा हळद आणि पाणी एकत्र करुन पेस्ट बनवा. हे नाभीवर १५ मिनिटे लावून ठेवावी. दुसरा उपाय म्हणजे एक वाटी कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून कापसाच्या मदतीने नाभी स्वच्छ करावी. तसेच लिंबाच्या ५-८ पानांची पेस्ट बनवा. यामध्ये चिमूटभर हळद मिसळून नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर धुवून घ्यावे. आणखी एक उपाय म्हणजे एक-एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेल मिसळा. यामध्ये टी ट्री ऑइलचे ३-४ थेंब मिसळून कापसाकच्या मदतीने नाभीवर लावा.
अर्धा चमचा लसणाचे तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ करा. तसेच एक-एक चमचा व्हिनेगर आणि कोमट पाणी मिसळा. हे कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. २० मिनिटांनंतर स्वच्छ करावी. तसेच अर्धा चमचा लवंगाचे तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटानंतर स्वच्छ करुन घ्यावी.