आरोग्यनामा ऑनलाईन टीम- पुरूषांपेक्षा महिलांना सतत कमरेचा त्रास होत असतो. कमरेच्या दुखण्याने महिलांना काम करणेही अवघड होऊन बसते. दररोजची कामे करताना कंबरदुखीचा त्रास सहन करणे खूपच वेदनादायी असते. अशी ही कंबरदुखी टाळायची असेल तर काही आधीपासून घेतली पाहिजे. जेणेकरून कंबरदुखीचा त्रास होणार नाही.
कंबरदुखीचा त्रास टाळण्यासाठी जड वजन उचलताना किंवा जमिनीवरील कोणतीही वस्तू उचलताना कमरेतून वाकू नका. अगोदर गुडघे वाकवून खाली वाका आणि ज्या वेळी हात त्या वस्तूपर्यंत पोहोचेल तेव्हा उचलून गुडघे सरळ करत उभे राहावे. अधिक काळ एकाच स्थितीत बसून काम करू नये. काही वेळानंतर उभे राहावे किंवा बसण्याची स्थिती बदलावी. यामुळे कमरेला आराम मिळतो. या प्रकारे ज्यांना कमरेत दुखत असेल तर त्यांनी जाड गादीवरच झोपावे. खुर्चीवर बराच वेळ बसायचे असेल तर आपल्या पाठीला अशा प्रकारे टेकवून बसा की ती कायम सरळ राहील. मानेला सरळ ठेवण्यासाठी खुर्चीच्या मागे एक जाड टॉवेल घडी घालून ठेवू शकता. जेणेकरून कमरेवर अतिरिक्त दाब पडणार नाही.