आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आमाशयचा अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रीक अल्सर असे अल्सरचे प्रकार आहेत. पोटातील पचनसंस्थेच्या आवरणावर निर्माण होणारे व्रण, जखमा म्हणजे अल्सर होय. पोषणाची कमतरता, तणाव, अनियमित दिनचर्या यामुळे अल्सर होतो, असे पूर्वी समजले जात होते. परंतु नवीन संशोधनानुसार अल्सर हा हेलिकोबॅक्टर पायरोली किंवा एच. पायरोली या जीवाणूमुळे होतो. अल्सरच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. काही प्रमाणात असंतुलित आहार आणि आपली अनियमित दिनचर्या यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.
पोहे
पोहे हे अल्सरवर एक रामबाण औषध आहे. याला बिटन राइस असेही म्हणतात. पोहे आणि बडीशेप समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करावे. २० ग्रॅम चूर्ण २ लिटर पाण्यामध्ये सकाळी टाकून ठेवा. त्यानंतर रात्रीतून हे पाणी घ्यावे. हे मिश्रण नियमितपणे सकाळी तयार करून दुपार किंवा संध्याकाळनंतर पिणे सुरु करावे. हे मिश्रण २४ तासात पूर्ण घ्यावे, अल्सरमध्ये आराम मिळेल.
केळी
अल्सरच्या उपचारासाठी दररोज २-३ केळीचे सेवन करावे. मिल्कशेक करून सुद्धा घेऊ शकता. केळीचे पातळ स्लाईस तयार करून वाळवून घ्यावेत. त्यानंतर मिक्सरमधून वाळवलेल्या स्लाईसचे चूर्ण तयार करून घ्या. दररोज २ चमचे चूर्ण आणि एक चमचा मध मिसळून हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस घ्या. एक आठवडा हा उपाय केल्यास अल्सरमध्ये आराम मिळेल.
कोबी
पत्ता कोबी आणि गाजर समान प्रमाणात घेऊन ज्यूस तयार करून घ्या. हे ज्यूस सकाळ-संध्याकाळ एक-एक कप घेतल्यास पेप्टिक अल्सरच्या रुग्णांना आराम मिळेल.
गायीचे तूप
अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी गायीच्या तुपाचे भरपूर सेवन कारणे फायदेशीर राहील.
बदाम
अल्सरच्या रुग्णांनी बदामाचे सेवन करावे. बदाम बारीक करून दुधातून सेवन करावेत. सकाळ-संध्याकाळ हे मिश्रण घेतल्यास अल्सर लवकर ठीक होईल.
शेवगा
शेवग्याची पाने बारीक करून दह्यासोबत पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टचे सेवन दिवसातून एकदा केल्यास अल्सरमध्ये आराम मिळेल.
ताक
ताकाची पातळ कढी करून अल्सरच्या रुग्णाला द्यावी. अल्सर पिडीत व्यक्तीला मक्याची भाकरी आणि कढी खाण्यास द्यावी. हा आहार सहजपणे पचतो.