आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही छोट्या-छोट्या समस्या अधून-मधून नेहमीच सतावत असतात. अशा समस्या दूर करण्यासाठी पारंपारिक उपाय करणे लाभदायक ठरते. लहान-लहान समस्या आणि त्यावरील काही पारंपारिक उपायांची आपण माहिती घेणार आहोत. साखरेत मुंग्या होणे, कारमध्ये दुर्गंधी, अथवा आरोग्याविषयीच्या समस्या या सर्वांसाठी काही खास पारंपारिक उपाय आहेत. हे सोपे आणि पारंपारिक उपाय जाणून घेवूयात.
नखांची सुंदरता
एरंडीच्या तेलाने नखांना थोडा वेळ मालिश करा. रोज झोपण्याअगोदर असे केल्याने नखांची चमक वाढते. नखे सुंदर दिसतात.
चमकदार दात
सुपारीला बारीक करुन त्यामध्ये ५ थेंब लिंबूचा रस आणि थोडेसे काळे मीठ टाका. या मिश्रणाने रोज दात घासा. दात चमकतील.
कारमधील दुर्गंधी
एका लहान वाटीत सफरचंदाचे तुकडे करुन ठेवा आणि ही वाटी गाडीच्या सीट खाली फ्लोरवर ठेवून द्या. एक दोन दिवसात हे तुकडे वाळतील, पुन्हा एकदा ही प्रक्रिया करा, कार मधून येणारी दुर्गंधी दूर होईल.
मुंग्यांचा उपद्रव
साखरेच्या डब्यात किंवा तांदुळात नेहमी मुंग्या होतात. यासाठी डब्यामध्ये २-४ लवंग टाकून ठेवा. मुंग्या डब्याकडे फिरकणार नाहीत. स्वयंपाक बनवल्यानंतर १-२ लवंग स्वयंपाकाजवळ ठेवतात.
बुटांची चमक
४-५ जास्वंदाच्या फुलांना बुटांवर घासा. यामुळे बुट चमकतात.
मीठ ओले होणे
वातावरणातील बदलांमुळे अनेक वेळा मीठ ओले होते. मीठाच्या कंटेनरमध्ये १०-१५ तांदूळाचे कच्चे दाने ठेवल्यास मीठाला ओलावा येणार नाही.
कॉलेस्टेरॉल
लसणाच्या दोन पाकळ्या नियमित खाल्ल्याने शरीरातील वाईट कॉलेस्टेरॉल कमी होतात. उच्च रक्तदाब कमी होतो. लसणाच्या दोन पाकळ्या सोलून खाव्यात. हा उपाय नियमित उपाशापोटी करा आणि एक ग्लास पाणी प्या. सतत ३ महिने असे केल्याने शरीरात ट्यूमर होण्याची शक्यता कमी होते.
डायबिटीज
एक चमचा जवसाच्या बिया चावून एक ग्लास पाणी सेवन करा. रोज सकाळी उपाशापोटी आणि रात्री झोपण्याअगोदर असे करावे.