आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अर्धशिशीने म्हणजेच मायग्रेनमुळे डोक्याच्या एकाच बाजूला तीव्र डोकेदुखी होते. कधी-कधी दोन्ही बाजूला दुखते. हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्धशिशीचा अॅटॅक येण्याची कारणे, उपाय आणि काळजी कशी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
अर्धशिशीच्या अॅटॅकची प्रमुख कारणे
१ स्त्रियांच्या मासिक पाळीत होणारे हार्मोन्स बदल.
२ रंगाचा, अत्तराचा सुगंध.
३ प्रकाशाची तीव्रता.
४ चहा-कॉफीचे अति सेवन.
५ अति तेलकट खाणे.
६ अनियमित झोप.
७ अति शारीरिक श्रम.
८ कामाचा ताण, अति व्यायाम.
९ ऋतुमानातील बदल.
हा आहे घरगुती उपाय
* एक लिंबू चिरून त्याचा अर्धा भाग कपाळावर रगडा. यामुळे वेदना कमी होतील. अर्धशिशीपासून मुक्ती मिळू शकते.
* नियमितपणे लिंबाच्या सरबताचे सेवन करावे. साखरेचा वापर टाळावा. सरबतात सैंधव वापरावे. लिंबाच्या रसामुळे शरीरातील अल्कलाइन आणि इलेक्टड्ढोलाइट्समध्ये वृद्धी होऊन शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
अशी घ्या काळजी
१ दही खाऊ नका.
२ उन्हात फिरणे टाळा.
३ छत्री किंवा टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.
४ मानसिक संतुलन ठेवा. अती ताण टाळा.
५ फार काळ उपाशी राहू नये.
६ तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसने टाळा.
७ अती विचार करू नका.
८ अती मांसाहार करू नका.
९ गोड ताक, कोकम सरबत, आवळा सरबतचे सेवन करा.
१० आहार वेळेवर आणि हलका घ्या.
११ उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचे प्रमाण थोडेतरी असावे.
१२ पाणी भरपूर प्या.
Visit : arogyanama.com