अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अपचनाची समस्या अलिकडे वाढत चालली आहे. जीवनशैलीमुळे आहारात झालेला बदल, सतत बदलणारी जवेणाची वेळ, व्यायामाचा अभाव, दगदग, धावपळ आणि कामामुळे येणारा मानसिक ताण या कारणांमुळे अपचन, गॅसेसची समस्या मोठ्याप्रमाणात जाणवते. ही समस्या आहारात काही बदल केल्याने आणि थोडी काळजी घेतल्यास बरी होऊ शकते.
झोप पूर्ण न होणे, गरजेपेक्षा जास्त वाढलेले वजन, अन्न व्यवस्थित चावून न खाणे, अन्न व्यवस्थित न शिजवणे ही सुद्धा अपचन आणि गॅसेस वाढण्याची कारणे आहेत. ३०.४ टक्के भारतीयांना आयुष्यभर अपचनाचा त्रास असतो, असे इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएट्रोलॉजीच्या अहवालात म्हटले आहे.

हे उपाय करा

* जवस हे गॅसेससह अ‍ॅसिडिटीवर गुणकारी आहे. रोज एक चमचा जवस चूर्ण खाल्ल्याने काही दिवसातच अ‍ॅसिडीटी कमी होईल. जवसमध्ये ओमेगा- ३, सॉल्युबल फायबर, लिगनेस असते.

* जेवणानंतर अचानक पोट जड पडणे किंवा अ‍ॅसिडिटा त्रास होत असल्यास पुदिन्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो. पुदिन्यात टेरेपेनाइटस, एरियोस्त्रिटीन, हॅस्पेरिडिनची मात्रा असते.

* हिरव्या भाज्यांचा रस प्यायल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. रोज एक ग्लास रस प्यायल्याने अपचन अ‍ॅसिडीटी, आणि गॅसेससारख्या समस्या मिटतात. हिरव्या भाज्यांमध्ये मॅग्नेशिअम, डायटरी फायबर, प्रोटिन भरपूर असतात.

* गॅसेसचा त्रास जास्त असल्यास अदरकाचे छोटे छोटे तुकडे हळूहळू चाऊन त्याचा रस प्यावा. १५ मिनिटांमध्ये गॅसेसचा त्रास ४० टक्क्यांपर्यंत कमी होतो. आल्यामध्ये जिंजरॉल, जिंगरॉन, शोगाओल्स असते.

* जास्त जेवन केल्यामुळेअपचनाचा त्रास असल्यास जेवण झाल्यानंतर मेथी दाणे आणि काळे मिठ खाल्ल्याने फायदा होतो. मेथीदाण्यामध्ये अ‍ॅपिनिन, फॅनचोने, लिमोनेन, असते.

* अननसमधील फायबर पचनक्रियेसाठी उपयुक्त आहे. रोज अननसाचे एक किंवा दोन काप खाल्ल्याने पचन सुधारेल आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल. अननसात बिटा कॅरोटिन, फ्रुकटोज, क व्हिटामिन भरपूर प्रमाणात असते.