आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High BP & Coronavirus | कोरोना काळात हाय-ब्लडप्रेशरच्या रूग्णांनी आपले खाणे-पिणे आणि जीवनशैलीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या (High BP & Coronavirus) रुग्णांना संसर्गाचा जास्त धोका असतो यासाठी अशा रूग्णांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे.
कोरोना काळात अशी घ्या काळजी
डाएटकडे लक्ष द्या :
हेल्दी डाएटद्वारे ब्लड प्रेशर मोठ्याप्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकते. मीठ, तेलकट आणि मसालेदार जेवणाचे सेवन कमी करा आणि बॉडी हायड्रेट ठेवा.
तणावापासून दूर रहा :
हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कठिण काळात सुद्धा स्वतःला तणावापासून दूर ठेवावे. एक्सरसाईज, योगा, ध्यान आणि अरोमा थेरेपी करा.
बीपीचे औषध चुकवू नका :
डॉक्टरांनी ब्लडप्रेशरचे दिलेले औषध स्किप करू नका. यामुळे ब्लड प्रेशर एकदम वर-खाली होऊ शकते.
स्मोकिंग टाळा :
या आजारात धूम्रपान आणि दारूपासून दूर रहा.
वजन नियंत्रित ठेवा :
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर वजन नियंत्रणात ठेवा. वजन जास्त असेल तर शरीराच्या एकुण वजनाच्या केवळ 10 टक्के वजन कमी केले तरी ब्लड प्रेशर नियंत्रित राहील.