आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Uric Acid | सध्याच्या युगात अनेक लोक युरिक अॅसिडच्या समस्येने त्रस्त आहेत. जेव्हा रक्तातील यूरिक अॅसिडची पातळी जास्त होते तेव्हा त्रास वाढतो (High Uric Acid). यामुळे पाय, सांधे आणि बोटांमध्ये क्रिस्टल्स तयार होतात, ज्यामुळे वेदना आणि सूज वाढते. जर शरीरात यूरिक अॅसिड वाढले असेल तर कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घ्या (Tips For Uric Acid Patient)…
यूरिक अॅसिड कसे कमी करावे?
1. वजन वाढू देऊ नका
युरिक अॅसिड वाढत्या वजनाशी संबंधित आहे, त्यामुळे ही समस्या वाढू नये असे वाटत असेल तर वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवा. तंदुरुस्त राहिल्यास गाउट फ्लेरेक्सचा धोका कमी होऊ शकतो.
2. व्हिटॅमिन सीची कमतरता होऊ देऊ नका
रक्तातील युरिक अॅसिड वाढू नये यासाठी असे अन्न जरूर खा ज्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असेल. या पोषक तत्वाच्या मदतीने, यूरिक अॅसिडची पातळी कमी केली जाऊ शकते. त्यामुळे संत्री आणि लिंबू (Orange, Lemon) जरूर खा. (High Uric Acid)
3. गोड पदार्थ टाळा
खूप गोड पदार्थ (Sweet Food) किंवा गोड पेये घेत असाल तर युरिक अॅसिडची पातळी वाढून गाउटचा धोका वाढेल. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
4. लो प्युरीन फूड्स खा
युरिक अॅसिडची समस्या कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात हाय प्युरीन असलेल्या
पदार्थांऐवजी लो प्युरीनयुक्त फूड खा, यासाठी दुधाचे पदार्थ, नट, फळे, भाज्या, बटाटे आणि भात खा.
5. दारू टाळा
अल्कोहोल (Alcohol) आरोग्यासाठी वाईट आहे, त्याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो,
परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की यामुळे यूरिक अॅसिडची पातळी देखील वाढते. ही वाईट सवय लवकरात लवकर सोडा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- High Uric Acid | high uric acid control tips weight loss vitamin c rich food sweet drinks low purine diet alchohol
Pumpkin Seeds | टाकाऊ समजून डस्टबिनमध्ये टाकू नका भोपळ्याच्या बिया, अन्यथा मिळणार नाहीत फायदे
Diabetes आणि Heart च्या पेशंटने करावे ‘या’ पाण्यातील वनस्पतीचे सेवन, आरोग्याचे टेन्शन होईल दूर