आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol| कोलेस्ट्रॉल शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, परंतु जर त्याची पातळी वाढली तर अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) शरीरासाठी आवश्यक असते, तर बॅड कोलेस्ट्रॉल शरीराला हानी पोहोचवते. गुड कोलेस्ट्रॉलमध्ये चरबीपेक्षा जास्त प्रोटीन असतात आणि बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) मध्ये जास्त चरबी असते. हेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा ते शिरांमध्ये जमा होते, त्यामुळे हृदयविकाराचा (Heart Disease) धोका असतो. (High Cholesterol)
वाईट जीवनशैली कारणीभूत
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाइल आहे. तुम्ही जे काही खाता ते तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करते. प्रक्रिया केलेले मांस, बीफ, पोर्क, कुकीज यासारखे हा सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, खाणे ताबडतोब बंद करा. बॅड कोलेस्ट्रॉलवर योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास स्ट्रोक, हार्ट अटॅक, छातीत दुखणे, किडनीच्या समस्या (Stroke, Heart Attack, Chest Pain, Kidney) असे अनेक आजार होऊ शकतात. (High Cholesterol)
कसे करावे कंट्रोल
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात काही बदल करावे लागतील. आहारात हिरव्या भाज्या, फळे, धान्ये, बिया आणि फायबरयुक्त अन्नाचा समावेश करा.
या वयानंतर व्हा सतर्क
तुमचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, डॉक्टरांच्या मते, तुम्ही वर्षातून किमान दोनदा कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली पाहिजे. अनहेल्दी लाईफ स्टाइलमुळे आजकाल प्रौढ देखील या आजाराला बळी पडत आहेत.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- High Cholesterol | know here how to control bad cholesterol
Fast Aging | ‘या’ 5 सवयींमुळे ऐन तारुण्यात दिसू शकता म्हातारे, आजपासूनच व्हा दूर