आरोग्यनामा ऑनलाइन टीम – High Blood Pressure Tips | डॉक्टर आणि तज्ञ नेहमीच सल्ला देतात की आहारातील सोडियम (Sodium) कमी केल्यास रक्तदाब नियंत्रित (Blood Pressure Control) करण्यास मदत होते. कारण सोडियमचे जास्त सेवन केल्याने असंतुलन आणि सूज येऊ शकते. कारण शरीर मीठ बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाणी साठवून ठेवते. यामुळे अनेकदा शरीरात ब्लड प्रेशर (High Blood Pressure Tips) वाढते.
अमेरिकन हार्ट असोसिएशनने दररोज सोडियमचे सेवन 1,500 मिलीग्रामपर्यंत मर्यादित ठेवण्याचे सुचवले आहे. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की एक चमचा मिठात सुमारे 2,400 मिलीग्रॅम सोडियम असते, जर तुम्ही भरपूर, मसालेदार आणि खारट पदार्थ (Spicy And Salty Foods) खाल्ले तर ते खूप जास्त होईल.
त्यामुळे रक्तदाब कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आहारातील मीठ कमी करणे. रक्तदाब पातळी कमी करून निरोगी संतुलन राखण्यास मदत करणारे 3 पदार्थ जाणून घेवूयात (Three Foods That Can Help Maintain A Healthy Balance By Lowering Blood Pressure Levels)…
केळी (Banana)
केळी पोटॅशियमचा (Potassium) समृद्ध स्रोत आहे, हे खनिज (Minerals) रक्तदाब पातळी व्यवस्थापित करण्यात मदत करते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की पोटॅशियम आणि सोडियमचे 2:1 प्रमाण शरीरातील रक्तदाब पातळी संतुलित करण्यास मदत करते. तुम्ही केळ्याचा शेक (Banana Shake), स्मूदी (Banana Smoothie) बनवू शकता किंवा आख्खे खाऊ शकता (High Blood Pressure Tips).
तांदूळ, शेंगदाणे आणि बदाम (Rice, Peanuts and Almonds)
तांदूळ (Rice), शेंगदाणे (Peanuts), भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds), काजू (Nuts), बदाम (Almonds) आणि ओट्स (Oats) हे मॅग्नेशियमचे (Magnesium) चांगले स्रोत आहेत.
हे एक आवश्यक खनिज आहे, जे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
कारण मॅग्नेशियम नायट्रिक ऑक्साईडला (Nitric Oxide) धमनीच्या भिंती शिथिल करण्यास आणि रक्ताचा सुरळीत प्रवाह करण्यास मदत करते.
एका अभ्यासानुसार, असे आढळून आले आहे की 500 मिलीग्राम ते 1,000 मिलीग्रामपर्यंत मॅग्नेशियमचे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यास तसेच कमी करण्यास मदत करते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Milk and Dairy Products)
आहारात (Diet) ताज्या आणि घरगुती दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब पातळी कमी होण्यास मदत होते.
आपले शरीर हाडे आणि दातांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साठवते,
परंतु हे एक खनिज आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart Health) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जे थेट रक्तदाब वाढल्याने प्रभावित होते.
कॅल्शियम रक्तवाहिन्यांचा विस्तार आणि आकुंचन होण्यास मदत करते,
परंतु कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीद्वारे रक्त पंप करणे कठीण होते.
यामुळे शरीर कॅल्शियम मिळविण्यासाठी इतर स्रोत शोधते, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या समस्या (Bone Problems) उद्भवू शकतात.
तुमच्या आहारात दूध (Milk), चीज (Cheese), दही (Curd), ताक (Buttermilk) यासारख्या कॅल्शियम युक्त गोष्टींचा समावेश करा.
#Lifestyle #Health #Health Tips #Healthy Lifestyle #High Blood Pressure Control #High Blood Pressure Diet #Salt Intake In Hypertension #Hypertension Controlling Tips #Lifestyle And Relationship #Health And Medicine #हेल्थ टिप्स #हेल्थी लाइफस्टाइल #उच्च रक्तदाब नियंत्रण #उच्च रक्तदाब मध्ये मीठ खाणे #उच्च रक्तदाब नियंत्रण टिप्स
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- High Blood Pressure Tips | these 3 mineral rich foods can fix high blood pressure
Hearing Loss | तुमची ऐकण्याची क्षमता प्रभावित करू शकतात ‘या’ 4 सवयी, जाणून घ्या उपाय