पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आज जागतिक योगा दिवस आहे. त्यामुळे भारतातच नाही तर भारताबाहेरही आज योग दिवस साजरा केला जात आहे. परंतु या दिवसाच महत्व आजच्या पुरतच नाही. तर कायम स्वरूपी असलं पाहिजे. कारण योगा एकदिवस करण्याची गोष्ट नाही तो नियमित केला पाहिजे. कारण आज सर्वांनाच योगाची खूप गरज आहे. त्यामुळे आपण सध्या स्वतःबरोबरच आपल्या मुलांनाही योगा शिकवणे गरजेचे आहे. कारण आता लहान मुलांमध्येही वेगवेगळे आजार तसेच लठ्ठपणाची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांना खालील योगासने शिकवा. त्याचा त्यांच्या आरोग्यासाठी फायदा होईल.
लहान मुलांना शिकवायची योगासने
१) त्राटकं आसन : लहान मुलांना हे आसन शिकवा. यामध्ये मुलांच्या समोर एक मेणबत्ती ठेवून मेणबत्तीच्या वातीला एकसारखं पाहायला सांगा. हे आसन केल्यामुळे मुलांची दृष्टी सुधारते. तसेच त्यांचं मन कोणत्याही कामात एकाग्र होते. अगदी सोपं असं हे आसन आहे. जोपर्यंत डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत हे आसनं मुलांना करायला सांगा. हे आसन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे.
२) एबीसी योगासन : या आसनात मुलांना ए, बी, सी, डी म्हणायला लावा. जेणेकरून त्यांच्या जिभेचा व्यायाम होईल. आणि मुलांना न अडखळता बोलता येईल. मुलांना सकाळी सकाळी प्राणायाम करायला सांगा. तसे केल्याने मुलांची चिडचिड होणार नाही. आणि मुले शांत राहतील.
लहान मुलांना योगाचे फायदे
मुलांनी नियमित योगा केल्याने त्यांच्या बसण्याची पद्धत सुधारते. तसेच मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते मन लावून अभ्यास करतात .आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणंही त्यांना सोपं जातं. मेडिटेशन आणि दीर्घ श्वास यामुळे मुलांमधील ताण कमी होण्यास मदत होते. ते चिडचिड करत नाहीत. यामुळे लहान मुलांचा एखाद्या गोष्टीतील स्टॅमिना वाढतो. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.