आरोग्यानामा ऑनलाईन टीम – वयाच्या विविध टप्प्यात मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हार्मोन्समुळे हे बदल होत असताना या काळात आरोग्याचेही काही प्रश्न निर्माण होतात, ज्यावर वेळीच उपचार करणे जरूरी असते. योग्यवेळी उपचार न केल्यास समस्या अधिक वाढत जाते. वयाच्या २० व्या वर्षानंतर सुद्धा मुलींच्या शरीरात काही मोठे बदल होतात. यामुळे त्यांना काही समस्यांनाही सामोरे जावे लागते. या समस्या कोणत्या आणि त्यावर कोणते उपाय करावेत, अशी महत्वाची माहिती आपण करून घेणार आहोत.
१ वजन वाढते
या वयात मुलींचे मेटाबॉलिजम स्लो होते. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या होते.
उपाय
जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळावे. रोज कमीतकमी तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
२ पीरियड्स
वीस वय पार केल्यानंतर मासिक पाळी वेळेवर येत नाही. हार्मोन्स अनियंत्रित झाल्याने ही समस्या होते.
उपाय
आहारात हिरव्या भाज्या आणि फळे वाढवा.
३ केस
या वयानंतर मुलींची हनवुटी, पोट आणि छातीवर केस येतात.
उपाय
हे केस काढण्यासाठी रिमूव्हिंग क्रिम अथवा रेझरचा वापर करू शकता. लेजरच्या मदतीने कायमस्वरूपी केस काढू शकता.
४ केसांवर परिणाम
वीस वय पार केल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे मुलींचे केस रफ आणि कोरडे होतात.
उपाय
तीन ते चार चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करा. ते कोमट झाल्यानंतर केसांना मसाज करा. यानंतर टॉवेल हलका गरम करून केसांना बांधा.
५ पिंपल्स
वीशीनंतर मुलींमधील हार्मोनल चेंजेसमुळे पिंपल्स येतात. त्वचा कोरडी होते.
उपाय
जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.