आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळ्यात अनेक आजार वाढतात. स्कीन इन्फेक्शन, स्कीन अॅलर्जी, पोटाच्या समस्या, सर्दी-खोकला, ताप, केसगळती, घशाचं इन्फेक्शन अशा समस्या होतात. हे आजार आणि कोरोना असे दुहेरी संकट सध्या असल्याने इम्यूनिटी सिस्टीम मजबूत ठेवावी लागणार आहे. पावसाळा तर व्हायरस आणि बॅक्टेरिंचा आवडता काळ असतो. अशात जर तुम्ही व्हिटॅमिन सी चं सेवन नियमित केलं तर अनेक फायदे तुम्हाला होतील. कशाप्रकारे पावसाळ्यात आजारांपासून बचाव करावा ते जाणून घेवूयात…
हे लक्षात ठेवा
1 आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळेल.
2 व्हिटॅमिन सी मायकोबॅक्टेरिअम स्मॅगमॅटीस नावाच्या एखा नॉन-पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारतं. रोज कमीत कमी 500 मिली ग्रॅम व्हिटॅमिन सी चं सेवन करावं. यामुळे सर्दी-खोकला आणि वेगवेगळ्या व्हायरसने होणारे इन्फेक्शन टाळता येईल.
3 पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी चं सेवन केलं तर रक्तात अँटी-ऑक्सिडेंटचं प्रमाण साधारण 30 टक्के वाढतं. ज्याने शरीर आजारांससोबत लढण्यासाठी तयार होतं.
4 त्वचा चांगली ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरतं. हे त्वचेवर लावल्याने याच्या अॅसिडीक गुणांमुळे कोलेनन आणि इलॅस्टिकचं प्रॉडक्शन वाढतं. अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.