आरोग्यनामा ऑनलाईन- बरेच लोक हिवाळ्यात सर्दी टाळण्यासाठी उबदार सेवन करतात. यामुळे पोट साफ होण्याबरोबरच शरीरात असलेली घाण साफ होण्यास मदत होते. यामुळे डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याची शिफारस करतात. परंतु, प्रत्येकाला माहीत आहे का? की गरम पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्याने फायद्याच्या जागी तोटा होतो. जास्त गरम पाणी पिण्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊ गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे..
जाणून घेऊ अधिक गरम पाणी पिण्याचे फायदे …
१) थकवा दूर होतो
हे शरीराला पोषक घटक मिळवण्यात मदत करते. दिवसभराचा थकवा काढून टाकून शरीर आरामदायी बनवते.
२) वजन कमी करते
गरम पाण्याचे सेवन केल्याने पोट बर्याच काळासाठी भरलेले राहते. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणास मदत होते.
३) रक्त परिसंचरण चांगले होते
गरम पाणी शरीरात रक्ताचे प्रवाह वाढविण्यात मदत करते. सुधारित रक्त परिसंचरण अनेक आजारापासून संरक्षण करते.
४) मासिक पाळीची वेदना कमी करते
या दिवसांमध्ये स्त्रियांना असह्य वेदना, जळजळ, पोटात दुखणे यांचा सामना करावा लागतो. जर आपण कोमट पाणी पिले तर या समस्यापासून आराम मिळतो. आणि पोट साफ होण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याची बाटली पोटावर ठेवून शेकवले तर मासिक पाळीच्या समस्येपासून आराम मिळतो.
५) त्वचा ग्लो करते
हे पाणी पिण्यामुळे घामाच्या स्वरूपात शरीरातील घाण बाहेर येते. त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ होऊन पोषण मिळते. चेहऱ्यावरील डाग, मुरुम, सुरकुत्या काढून टाकून त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
गरम पाणी पिण्याचे तोटे जाणून घ्या …
१) तोंडात फोड येऊ शकतात
जास्त गरम पाणी पिण्यामुळे तोंडात फोड येऊ शकतात. आपल्याला तोंडात जळजळ होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
२) अंतर्गत अवयवांचे नुकसान
गरम पाणी अती प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. यामुळे अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते. तसेच पचन प्रणाली खराब होऊ लागते.
३) किडनीचे नुकसान
किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. परंतु जास्त गरम पाणी पिण्यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. हे किडनीचे चांगले कार्य प्रतिबंधित करते.
४) मेंदूत सूज येते
गरम पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. यामुळे शरीरास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.