आरोग्यनामा ऑनलाईन टीम : आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य आणि शरिरयष्टी सुव्यवस्थीत ठेवण्यासाठी अनेक प्रकारांचा अवलंब करतो. त्यात जीम, डायट यांचा समावेश अधिक असतो. त्यातल्या त्यात डायट म्हटलं की त्यात ग्रीन टीचा समावेश असतोच. कारण ग्रीन टी मुळे आपली पाचन प्रक्रिय नीट राहते आणि शरिरात अतिरिक्त फॅट रोखण्यास मदत करते. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोन कप ग्रीन टी पीने आरोग्यासाठी कधीही उत्तमच. काही मंडळी अशी आहेत की लवकर वजन कमी करण्यावर प्रभावी म्हणून ग्रीन टी चे अधिक सेवन करतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की ग्रीन टीच्या अधिक सेवनाने शरिरावर त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
दिवसभरात जर तुम्ही ५ कपांपेक्षा अधिक ग्रीन टी चे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. आपण म्हणतो हर्बल टी घेतल्याने काही अपायकारक परिणाम होणार नाही. पण ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये टेनन नामक रसायनामुळे पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढते. या रसायनामुळे बद्धकोष्टता, पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात. त्यामुले ग्रीन टी जेवण झाल्यानंतर घ्यावा. किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेत ग्रीन टी घ्यावा.
मात्र ग्रीनटी दिवसभरात अधिकवेळा घेतली तर तीव्र डोकेदुखी, घाबरल्यासारखे होणे, निद्रानाशाची समस्या, उलटी, डायरिया, चिडचिडेपणा, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे, हातापायात कंप, हार्ट बर्न,चक्कर येणे, कानांमध्ये आवाज येणे, अशा त्रासांना समोरे जावे लागते. तर पेप्टक अल्सरची समस्या ज्या लोकांना आहे, त्यांनी तर ग्रीन टी घेऊच नये. त्याचा घातक परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर पडू शकतो.
तसंच ग्रीन टी मधील दोन कप ग्रीन टी मध्ये २०० ग्रॅम कॅफन असते. त्यामुले रसायने गर्भवती महिलांसाठी अधिक घातक ठरू शकतात. तसंच लहान मुलांना स्तनपान देणाऱ्या महिलांनीही ग्रीन टी घेऊ नये. ग्रीन टी घ्यायचाच असल्यात तो दिवसातून फक्त एक किंवा दोन कप घ्यावा, अधिकवेळा ग्रीन टी घेतल्यास गर्भपातही होऊ शकतो.
दरम्यान, वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी शरिरासाठी गुणकारी आहे, तसाच त्याचे अतिसेवन शरिरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे ग्रीन टी रोजच्या जीवनात घ्यावी पण कमी प्रमाणात त्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते.