* सदाफुलीच्या फुलांचा आणि पानांचा रस चेहऱ्यावरील पुरळ, फोडांवर लावल्यास फरक दिसून येईल. पानं आणि फुलं थोड्या पाण्यात बारीक करून याचा लेप चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळेस लावल्यास लवकर आराम मिळतो.
* याच्या लाल आणि गुलाबी फुलांचा उपयोग डायबिटीजमध्ये होतो. या फुलांचे सेवन रक्तशर्करा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दोन फुले एक कप उकळलेल्या पाण्यामध्ये किंवा साखर न घातलेल्या चहामध्ये टाकून झाकून ठेवा. थोड्यावेळाने थंड झाल्यानंतर फुले काढून हे पाणी रुग्णाला पिण्यासाठी द्यावे.
* वैज्ञानिक सध्या सदाफुलीच्या फुलांचा उपयोग करून कॅन्सरसारख्या घातक रोगांवर औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
* या रोपाच्या विविध भागांचा वापर ल्युकेमियासारख्या रोगांचे निदान करण्यासाठी करतात. आधुनिक शोधानुसार या रोपाच्या पानांमध्ये आढळून येणारे प्रमुख अल्कलायड रासायानंसारखे विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन रसायन ल्युकेमियाच्या उपचारासाठी उपयोगी मानले जाते.
* या रोपाची पाने तोडल्यानंतर जे दुध बाहेर पडते, ते जखमेवर लावल्यास कोणत्याही प्रकारचे संक्रमण होत नाही आणि जखम लवकर भरून येते.
* शांत झोप लागत नसलेल्या रुग्णांनी सदाफुलीच्या पानांचा मुरब्बा करून अल्पप्रमाणात सेवन करावा. या उपायाने शांत झोप लागते. या रोपाच्या माध्यमातून कोणत्याही रोगावर उपचार करताना एकदम कमी प्रमाणात याचे सेवन करावे नाही तर यामधील रासायनिक गुणांमुळे जास्त सेवन घातक ठरू शकते.
* या रोपाची पाने आणि फुले एकत्रितपणे बारीक करून मुळव्याधीवर लावल्यास लवकर आराम मिळतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा.
* मधमाशी किंवा एखादा किडा चावल्यास सदाफुलीच्या पानांचा रस त्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो. त्वचेवर लाल डाग, खाज किंवा एखादी अॅलर्जी असल्यास या पानांचा रस लावल्याने आराम मिळतो.
* त्वचेवर जखम किंवा पुरळ-फोड झाल्यास आदिवासी लोक या पानांचा रस दुधात मिसळून लावतात. हा उपाय केल्यास जखम लवकर पिकते आणि त्यामधील पु, घाण बाहेर पडते.