आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलेली जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष न दिल्याने एड्सपेक्षाही जास्त जीवघेणा एक आजार होऊ शकतो. जागतिक स्तरावर एड्सपेक्षा जास्त मृत्यू हेपिटायटस बी मुळे होतात आहेत, असे जागतिक आरोग संघटनेने म्हटले आहे. हा आजार शरीरात एचबीव्ही व्हायरस पसरल्यामुळे होतो. हा व्हायरस शरीरामध्ये संक्रमित रक्त किंवा संक्रमित व्यक्तीशी शारीरीक संबंध ठेवल्याने पसरतो. यामुळे फुफ्फुसामध्ये संसर्ग होतो किंवा कॅन्सर सारख्या समस्या होऊ शकतात. हा आजार ओळखण्याचे पाच संकेत आपण जाणून घेणार आहोत.
ही आहेत लक्षणे
१ त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होणे
२ युरिनचा रंग ब्राऊन अथवा ऑरेंज होणे
३ दिर्घकाळ आजारी राहणे
४ सलग काही महिने थकवा आणि कमजोरी जाणवणे
५ मळमळ आणि वारंवार उलटी होणे