आरोग्यनामा ऑनलाईन-अनेकदा ऋतू बदलला की शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागतात. यामध्येच हिवाळा सुरु झाल्यावर थंडीत पाण्यात खूपवेळा राहिल्याने किंवा मातीमुळे अनेकांच्या पायांना भेगा (heels) पडतात. टाचांमधून रक्त (blood) येतं किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा महागडी औषधे, क्रीम वापरली जातात. परंतु त्याने फारसा फरक पडत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. म्हणूनच यावर तोडगा म्हणून घरगुती (homemade) उपाय करणं फायदेशीर ठरतं. यात(heels) घरीच तयार करता येणाऱ्या सारखी क्रीम कोणती ते जाणून घेऊयात.
साहित्य
– नैसर्गिक मेण – 50 ग्रॅम
– मोहरीचं तेल – 100 ग्रॅम
– कापूर – 10 ग्रॅम
कृती
सर्वात प्रथम मोहरीचं तेल गरम करा आणि त्यात मेण टाकून ते वितळून घ्या. मेण पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात कापूर टाका. हे मिश्रण थोडा वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर एका डबीत भरुन ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल टाचांचा नियमितपणे लावा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.