आरोग्यानामा ऑनलाईन टीम : रोज एक सफरचंद खाल्ल्यास आरोग्य एकदम ठणठणीत राहते. पण हेच सफरचंद जर सालीसकट खाल्ले तर अनेक आजार तुमच्या जवळदेखील फिरकणार नाहीत. एवढी जबरदस्त ताकद सफरचंदाच्या सालीत आहे. यात अनेक पोषक जीवनसत्त्व असतात. हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा तसेच त्वचेच्या समस्या दूर होतात. काही लोक मुतखडा होईल या गैरसमजातून सफरचंदाची साल खात नाहीत.
जाणून घ्या सालीचे फायदे
१ तल्लख बुद्धी
विकारांपासून मेंदूचे संरक्षण होते. बुद्धी तल्लख होते. विचारशक्ती वाढते.
२ निरोगी फुफ्फुसे
श्वसनाची समस्या तसेच फुफ्फुसाच्या समस्या दूर होतात. शरीराचे आरोग्य सुधारते.
३ दृष्टी सुधारते
मोतीबिंदू होत नाही. दृष्टी सुधारते.
४ रक्त वाढते
सफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने अॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. रक्तवाढ होते.
५ मधुमेहावर नियंत्रण
याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रियादेखील होते.
६ लठ्ठपणा कमी होतो
वजन कमी करण्यासाठी सफरचंद सालीसकट खावे. यामुळे चरबी कमी होते. यातील उर्सोलिक अॅसिडमुळे वजन कमी होते.
७ हृदयरोग दूर होतात
सालीसह सफरचंद खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यातील फायबर्समुळे कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो.
८ यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास कमी होतो.
९ कर्करोग शक्यता कमी
यातील ट्रिटरपेनाइड्स तत्त्वांमुळे कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते.
Visit : arogyanama.com