आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हृदयरोगांबाबत लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यातील फरकही अनेकांना माहिती नसतो. हार्ट फेल्युअर झाल्यावर हार्ट काम करणे बंद करते, असे अनेकांना वाटते. परंतु ते पुर्ण सत्य नसून हार्टची ब्लड पंप करण्याची क्षमता कमजोर होते. यामध्ये रुग्णाचा लगेच मृत्यू होत नाही. जीवाला असलेला धोका वाढतो. हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक आज आपण जाणून घेणार आहोत.
हा आहे फरक
हार्ट अटॅक
आर्टरीज ब्लॉक झाल्यामुळे ब्लड हार्टपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक किती मोठा किंवा गंभीर होता हे आर्टरीजमधील ब्लॉकेजवर अवलंबून असते. जर ब्लॉकेज जास्त असतील किंवा वेळेअगोदर ब्लॉकेज दूर केले नाही तर हार्ट काम करणे बंद करते. यामध्ये रुग्णाचा काही वेळातच मृत्यू होऊ शकतो.
कार्डियक अरेस्ट
जेव्हा ह्रदयाचे ठोके बंद होतात तेव्हा तो कार्डियक अरेस्ट असते. काही तरंग या ह्रदयाच्या ठोक्यांसाठी जबाबदार असतात. जेव्हा या तरंग बंद होतात तेव्हा ह्रदयाचे ठोके पडणे बंद होते. यामधील जास्तीत जास्त प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होतो. तर काही प्रकरणात ह्रदयाला शॉक दिल्यानंतर ठोके पुन्हा सुरु होतात.
हार्ट फेल्युअर
यामध्ये ह्रदयाची पंप करण्याची क्षमता कमजोर होते. यात रुग्णाचा अचानक मृत्यू होत नाही. परंतु वेळेत उपचार करणे आवश्यक असते.