धकाधकीच्या जीवनात करू नका हृदयाकडे दुर्लक्ष

heart

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर काळजी घेतली पाहिजे. यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होऊ शकते. परंतु, कामाची ताण, धावपळ, स्पर्धा यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. यामुळे असा निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही नियमांचे पालन केल्यास हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. ज्यांच्या हृदयाचे दर मिनिटाला ७५ ठोके पडतात, त्यांना हृदयरोगाचा धोका तिप्पट अधिक असतो. तसेच ज्यांची हृदयगती यापेक्षा कमी असते, त्यांना हा धोका असतो. दर मिनिटाला ६५ ठोके हृदयासाठी योग्य आहेत, असे न्यू इंग्लंड र्जनल ऑफ मेडिसिनच्या एका अध्ययनातून स्पष्ट झाले आहेत.

जे लोक कमी तीव्रतेची कार्डिओ ट्रेनिंग घेतात, त्यांनी आठवड्यातून एक वा दोन वेळा जास्त तीव्रतेची ट्रेनिंग घ्यावी. निरोगी हृदयासाठी एलडीएल अर्थात अनावश्यक कोलेस्टेरॉलची पातळी कमी व एचडीएल अर्थात आवश्यक कोलेस्टेरॉलची पातळी अधिक असावी. एलडीएल १३० मिलिग्रॅम प्रतिडेसिलिटर आणि एचडीएल ४० मिलिग्रॅम प्रतिडेसिलिटर असायला हवे, असे जॉन हॉपकिन्स सिकेरॉना सेंटर फॉर द प्रिव्हेंशन ऑफ हार्ट डिसीजचे संचालक रॉजर ब्लूमॅटल यांनी म्हटले आहे. हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. यासाठी दह्यात अक्रोडची पूड टाकून सेवन करावी. त्यामुळे नऊ टक्के एचडीएल वाढू शकते. सकाळी कॉफी ऐवजी चहा प्यायल्यास एलडीएल ११ टक्के नियंत्रणात येते, असे तज्ज्ञ सांगतात.

उच्च रक्तदाबाची समस्या असणारांना हृदयरोग व मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. १२०-८० एमएमएचजी पेक्षा कमी रक्तदाब योग्य मानला जातो. उच्च रक्तदाबाने पीडित असलेल्या व्यक्तीने रात्री झोपण्याआधी नियमितरीत्या देवाची प्रार्थना केली तर तिचा रक्तदाब ३.५ टक्के कमी होतो, असे एका संशोधनात आढळले आहे.फास्टिंग ग्लुकोज पातळी एखाद्या मधुमेह मीटरसारखी आहे. त्यात पीडितास सकाळी रिकाम्यापोटी ग्लुकोमीटरने रक्ताचा नमुना घेऊन ग्लुकोजची पातळी तपासावी लागते. ती वाढल्यास मधुमेहाच्या रुग्णांना हृदयरोग, मूत्रपिंडाशी निगडित समस्या व डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. १४० एमजी, डीएलपेक्षा अधिक ग्लुकोजची पातळी धोकादायक ठरू शकते. ४० एमजी, डीएल पातळी सामान्य मानली जाते. शरीराने रक्तशर्करेचा योग्य वापर करण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवले पाहिजे.