आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हार्ट अटॅक म्हटले की अनेकजण घाबरून जातात. परंतु, योग्य काळजी घेतल्यास याचा धोका तुम्ही टाळू शकता. हृदयरोग होऊ नये म्हणून योग्य व्यायाम, आहार आणि जीवन आनंदाने जगणे खुप आवश्यक असते. हृदयरोगासारख्या आजारांची काही लक्षणे माहित असतील तरीही तुम्ही वेळीच सावध होऊ शकता. हार्ट अटॅक येण्याच्या एक महिन्याआधी किंवा काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसतात. ही लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
1 श्वास कमी घेतला जाणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे हार्ट अटॅकचं मोठे लक्षण मानले जाते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी 6 महिने पुरुष आणि महिलांना हे लक्षण दिसते. अशात चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या होतात.
2 केसगळती हृदय रोगासाठी मोठा धोका मानला जातो.
3 वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगळ्या प्रकारे छातीत वेदना होतात. पुरुषांनी या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
4 असामान्य थकवा हा हार्ट अटॅक येण्याचे मुख्य लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5 हार्ट अटॅक येण्यापूर्वी पोटात दुखू शकते. कधी कधी पोटात थांबून थांबून दुखते. शारिरिक तणावामुळेही पोटात दुखते.
6 झोप न येणे ही समस्याही हार्ट अटॅकशी संबंधित आहे.
Visit : arogyanama.com