आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Heart Attack | ‘अप्पू’, ‘वीरा कन्नडिगा’ आणि ‘मौर्य’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा कन्नड चित्रपटांचा स्टार आणि टेलिव्हिजन निर्माता पुनीत राजकुमारचे शुक्रवारी हृदय विकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले. तो अवघा 46 वर्षांचा होता. डॉक्टरांनी सांगितले की, जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखण्याची समस्या होऊ लागल्याने पुनीतला विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
हेवी वेट लिफ्टिंग करणार्यांना जास्त रिस्क
गरजेपेक्षा जास्त गंभीर प्रकारे वर्कआउट करणे हृदयासाठी धोकादायक (Heart Attack) ठरू शकते. हृदय रोग तज्ज्ञांनुसार जिममध्ये इंटेस वर्कआऊट करणे आणि हेवी वेट लिफ्टिंगवाल्यांवर जास्त रिस्क आहे. पुनीत राजकुमारच्या अगोदर मागील महिन्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (41), आणि मागील वर्षी अभिनेता चिरंजीवी सरजा (36) चा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
हार्ट सर्जन डॉ. पांडा म्हणाले…
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आणि भारतातील सर्वोत्तम हार्ट सर्जन डॉ. पांडा यांनी म्हटले की, व्यायाम करण्याचा चांगला आणि वाईट परिणाम असतो. कोण कसा व्यायाम करतो यावर ते अवलंबून आहे. तरूणांमध्ये या कारणामुळे हार्ट अटॅकची समस्या वाढत आहे.
शरीराला मध्यम स्तराच्या व्यायामाची आवश्यकता असते. खालच्या किंवा उच्च स्तराच्या शारीरीक हालचालीने प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. ज्यामध्ये हृदयरोग सर्वात वर आहे.
–
योग्य प्रकारे व्यायाम कसा करावा :
5-10 मिनिटांसाठी वार्म-अप करा
20-30 मिनिटांचा व्यायाम
5-10 मिनिटे शरीर थंड करण्यासाठी
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आठवड्यात किमान 150 मिनिटे मध्यम शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.
मध्यम व्यायामात चालणे, जॉगिंग किंवा पोहण्यासारख्या हालचाली करू शकता. शरीराला आराम देण्याची आवश्यकता आहे.
जास्त व्यायाम करणे आरोग्यासाठी ठिक नाही. (Heart Attack)
Web Title :- Heart Attack | regular gym goers at risk of heart attack read what indias top cardiac surgeon has to say
Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या
FSSAI | सणासुदीच्या काळात बनावट बेसनपीठ खरेदी करणे टाळा, ‘या’ सोप्या ट्रिकने शोधू शकता ‘भेसळ’