आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कारले, टॉमेटो, काकडी, बीट, भोपळा, अननस तसेच बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कडीपत्ता पुदीना या पानांपासून बनवलेल्या ग्रीन ज्यूसची क्रेझ सध्या वाढत आहे. सकाळी चालण्यासाठी येत असलेले लोक या ज्यूसची मागणी करताना दिसतात. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे यासह अशा प्रकारचा ज्यूस घेतल्यास आरोग्य आणखी चांगले राहू शकते. मात्र हा ज्यूस बनविणाताना चूकीचे कॉम्बिनेशन होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.
भाज्यांचे ज्यूस
१ कारले, टॉमेटो, काकडी एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा गुडघेदुखीवर लाभदायक ठरतो.
२ गाजर, बीट एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा रक्तशुद्धीकरण वाढवतो.
३ दुधी भोपळा व अननस एकत्रित करून तयार केलेला ज्यूस हा लठ्ठपणा कमी करून पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो.
ग्रीन ज्यूस
१ फळझाडे व फुलझाडांची पाने, बेल, दुर्वा, पालक, कोंथबीर, कढीपत्ता, पुदीना घालून ग्रीन ज्यूस तयार केला जातो. या ज्युसमुळे उत्साह वाढतो.
हे आहेत फायदे
१ मधुमेह व रक्तदाबाचे आजार दूर होतात.
२ डायलिसिसच्या काही रुग्णांनाही लाभ होतो.
३ गुडघेदुखीवर लाभदायक.
४ रक्तशुद्धीकरण होते.
५ लठ्ठपणा कमी होतो.
६ पचनशक्ती सुधारते.
७ उत्साह वाढतो.
Visit : arogyanama.com