आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हळदीच्या औषधी गुणांबद्दल अनेकांना माहिती असते. मात्र हळदीचे पाणी पिणेही अनेक समस्यांमध्ये उपयोगी असते हे क्वचितच लोकांना माहित असेल. जाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे –
असे बनवा आरोग्यवर्धक हळदीचे पाणी
एक ग्लास घेऊन त्यात अर्धे लिंबू पिळावे, त्यात हळद आणि गरम पाणी मिसळून चांगल्या प्रकारे मिक्स करा व नंतर मध मिसळावा. हळद काही वेळाने खाली बसते त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी हलवून मग प्यावे.
हळदीचे पाणी पिण्याचे फायदे
शरीराची सूज कमी करते –
हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. त्याशिवाय करक्युमिनमुळे सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत होते.
यकृताचे रक्षण –
हळदीचे पाणी विषारी गोष्टींपासून यकृताचे रक्षण करते आणि खराब यकृताच्या पेशी पुन्हा नीट होण्यास मदत होते. त्यामुळे यकृताचे रक्षण होते.
पचन चांगले राहते
हळदीच्या पाण्यामुळे जेवणाचे पचन चांगल्या प्रकारे होते व पोटाविषयीच्या आजारांपासून संरक्षण होते. पचनक्रिया उत्तम राहावी यासाठी दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.
कॅन्सरच्या पेशींशी लढा –
हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते. त्याच्यामुळे हळद हे अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडंट तयार करते त त्यामुळे शरीरात कॅन्सर निर्माण करणार्या पेशींशी लढू शकतो. तसेच करक्युमिनमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
मेंदू तल्लख होतो-
तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.
विस्मरणाचा आजार जसे डिमेन्शिआ आणि अल्झायमरमध्येही याचे नियमित सेवन करून त्रास कमी करता येतो.
हृदय निरोगी राहते
हळदीच्या पाण्यामुळे रक्त गोठत नाही आणि रक्त साफ होण्यासही मदत होते आहे. त्याशिवाय रक्ताच्या धमन्यांमध्येही रक्त साठत नाही. हळदीचे पाणीदेखील हृदय निरोगी राखण्याचे काम करते.