‘हेल्दी सेक्स लाईफ’ हवी असेल तर ‘या’ 5 गोष्टी नक्‍की लक्षात ठेवा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सेक्सला लाईफचा आनंद सर्वच घेत असतात. सेक्स कधी आणि किती करावा हे मात्र खूप कमी लोकांना माहिती असते. काहींनी हेही माहिती नसते की, त्यांच्या सेक्स लाईफ हेल्दी आहे किंवा नाही. तज्ञांचं म्हणणं आहे की, सेक्स लाईफ चांगली असेल तर लोक जास्त जगतात. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होण्यास मदत होते. एका चांगल्या सेक्स लाईफमुळे मायग्रेन, डिप्रेशनपासूनही आपण दूर रहातो. जर तुम्हाला हेल्दी सेक्स लाईफ हवी असेल तर या 5 गोष्टींची काळजी घ्या.

1) हेल्दी फूड- सेक्स लाईफ हेल्दी राहण्यासाठी हेल्दी फूड खूप गरजेचे आहे. जर तु्म्ही चांगला डाएट घेत असाल तर सेक्स चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, फायबर, कार्ब्स, ओमेगा 3, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन आणि मिनरल या सर्वांचा समावेश असायला हवा.

2) लठ्ठपणावर कंट्रोल- काही लोकांची सेक्स लाईफ चाळीशीनंतर खराब होते कारण त्यांचे वयावर कंट्रोल रहात नाही. तुम्ही नियमित व्यायाम करायला हवा. लठ्ठपणा हायपरटेंशन, डायबिटीज आणि अनेक दुसऱ्या आजारांना आमंत्रण देतो. याचा सेक्स लाईफवर परिणाम होतो.

3) भावनिक प्रतिबद्धता(Emotional engagement)-  वन नाईट स्टँडपेक्षा कैक पटीने त्यांच्यासोबत इंटिमेट होणं चांगलं आहे ज्यांच्याशी तुमची भावनिक प्रतिबद्धता (Emotional engagement) जास्त आहे. असे असेल तर तु्म्ही एकमेकांची जास्त काळजी घेता. सेक्स दरम्यान आपापसात बोलणं खूप महत्त्वाचं आहे.

4) धुम्रपान करू नका- धुम्रपान म्हणजेच स्मोकिंगचा सेक्स लाईफवर गंभीर परिणाम होतो. तंबाखूचा नसांवर परिणाम होतो. यामुळे उत्तेजनाही कमी होते. त्यामुळे चांगल्या सेक्स लाईफसाठी स्मोकिंगला अलविदा करा.

5) अल्कोहोल- सेक्स करण्यापूर्वी अल्कोहोलचे सेवन कधीच करू नका. कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो आणि सेक्सचा व्यवस्थित आनंद घेता येत नाही.