दाढी-मिशा ठेवण्याचे ‘हे’ १० फायदे, जाणून घ्या
१ दाढी अल्ट्राव्हायलेट किरणांपासून बचाव करते. यामुळे त्वचा टॅन होत नाही.
२ ज्यांना धुळीची अॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी दाढी फिल्टरचे काम करते. यामुळे अॅलर्जी निर्माण करणारे घटक नाकात जाऊ शकत नाहीत.
३ दाढी ठेवल्यास सुरकुत्या कमी दिसतात.
४ ब्लॅकहेड्स आणि त्वचेच्या काही समस्यांसाठी रेझर कारणीभूत असते. दाढी ठेवल्यास हे टाळता येऊ शकते.
५ डाग अथवा एखादी खूण लपविण्यासाठी दाढी उपयोगी पडते.
६ वारा भरपूर असल्यास त्वचा कोरडी पडते. मात्र, दाढी असल्यास त्वचेतील कोरडेपणा टिकून राहतो.
७ एक मनुष्य जीवनात शेवींगसाठी ३३५० तास खर्च करतो. म्हणजे सुमारे पाच महिने होय. हा वेळ वाचवता येऊ शकतो.
८ दाढी असल्याने बॅक्टिरिया तोंडात जात नाहीत. यामुळे घशाचा कोणताही त्रास होत नाही. तसेच गारव्यापासून बचाव होतो.
९ दाढी असल्यावर शरीराचे तापमान जास्त असते. यामुळे दमा, पडसे, सर्दी व इतर आजार टाळता येतात.
१० दाढी करताना तारूण्यपिटीकांमुळे इजा होण्याची शक्यता असते, हा धोका राहत नाही.
Comments are closed.