होम मेड पॉपकॉर्न
पॉपकॉर्न हे हेल्दी डायेट आहे. पॉपकॉर्नला बटर अथवा तेल न लावता खाल्ले तर ते शरिरासाठी हानिकारक नाही.
भेळ
भेळ सुद्धा हेल्दी स्नॅक्स असून यामध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि धने पावडर टाकावी. यावर हिरवी चटणी आणि दाणे टाकून त्याची चव वाढवता येते.
ड्राय फ्रुट्स
न्युट्रिशनसाठी ऑफिसमध्ये ड्राय फ्रुट्स खावेत. ऑफिसला जाताना हे घेऊन जाणे देखील सोपे आहे. कामात असताना भुक लागल्यास हे खावेत. फळे खाल्ल्यानेही तंदुरूस्त राहता येईल.
ऑफिसमध्ये भुक लागत असेल तर मोड आलेली कडधान्ये खावीत. कडधान्यात प्रोटिन, व्हिटॅमिन, अॅन्टी ऑक्सिडट्स आणि अमिनो अॅसिड असते. कडधान्ये खाल्ल्याने शरिरात ताकद येते. कडधान्यांमुळे फास्टफुड खाण्याची इच्छा कमी होते.
अशी मेन्टेन करा हेल्थ
एका जागेवर सतत बसणे आरोग्यासाठी हनिकारक ठरते. सततच्या बसण्याने मानेचा त्रास, पाठीचा त्रास होतो. ऑफिसमध्ये हेल्दी फुड सोबत थोडे स्ट्रेचनिंगही करावे. दर दोन तासांनी कामाच्या खुर्चीवरून उठावे. एक चक्कर मारावी. यामुळे आरोग्य उत्तम राहते.