आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरण थंड असल्यास शरीराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशा थंड वातावरणात शरीराला मानवणारा आहार घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी असे वातावरण खूप चांगले असले तरी अशा वातावरणात सर्दी, खोकला, ताप असे आजार सुद्धा होऊ शकतात. अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि शरीराला उर्जा देणारे काही खास पदार्थ असून याबाबत माहिती घेवूयात.
हे पदार्थ सेवन करा
* गरम चिकन सूपमध्ये सर्वाधिक उपचारक्षमता असते. गरम-गरम चिकन सूप प्यायल्यास गळा स्वच्छ राहण्यास मदत होते. तर शोरबामुळे ऊर्जा वाढते. शक्ती वाढवण्यासाठी त्यासोबत कांदा आणि लसूणचा वापर केला जातो.
* काही लोक सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्यासाठी लसूण, हर्स रेडीश, मिर्ची किंवा मसालेदार सॉस खातात. भारतीय जेवणामध्ये मसाल्याचा वापर हा असतोच, पण जर जेवण तसे नसेल तर मसालेदार सॉसचा वापरही करू शकता.
* अद्रक टाकून तयार केलेला चहा हे सर्दी, खोकला आणि तापावरचे सर्वोत्तम औषध ठरते. अद्रकचे पाणीही पिता येईल. त्यासाठी चांगल्याप्रकारे कापलेले २ चमचे अद्रक ५-१० मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्यावे. ते थंड करून प्यायल्याने शरीरासाठी फायद्याचे ठरते.
* लसणामध्ये अँलिन नावाचे फ्लेवरिंग द्रव्य असते. सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून याचा वापर केला जातो. तसेच ते अँटिऑक्सिडंटचे कामही करते.
* भरपूर प्रमाणात पेयांचे सेवन करावे. कॉफी, चहा किंवा इतर पेय पिण्याऐवजी भरपूर प्रमाणात पाणी आणि फळांचा सर घेणे अधिक उत्तम. काही लोकांसाठी हॉट ब्रेव्हरेज उपयोगी ठरतात. त्यामुळे नेहमी हर्बल टी घेऊ शकता. गरम पाण्यात लिंबू पाणी घेऊ शकता.
* व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आंबट फळे खाऊ शकता. नाष्ट्यामध्ये संत्रीचा ज्यूस प्यावा. किंवा अंगूरही खाऊ शकता.
* फक्त लिंबू, संत्री यासारख्या आंबट फळांपासूनच व्हिटॅमिन सी मिळते असे नाही. बटाटा, शिमला मिरची, अननस यातूनही व्हिटॅमिन सी मिळते. रोजच्या अन्नात याचा समावेश असल्यास सर्दी खोकल्याचा प्रतिकार केला जाऊ शकतो.