आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नवजात बाळाच्या योग्य शारीरीक विकासासाठी आईचे दुध अतिशय महत्वाचे असते. मातेने बाळला जन्माच्या सहा महिनेपर्यंत स्तनपान द्यावे. बाळाचे आरोग्य आणि वाढीसाठी आईने आहारात काही पदार्थ टाळले पाहिजे. अन्यथा याचा वाईट परिणाम बाळावर होऊ शकतो. स्तनदामातेने आयर्न, कॅल्शियम आणि फोलोट भरपूर असणारे पदार्थ सेवन करावेत. यामुळे दूध जास्त तयार होते. यामुळे आई आणि बाळ दोघांची रक्ताची कमतरता पुर्ण होते. स्तनदा मातेने कोणते पदार्थ सेवन करावेत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
फिश
यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्समुळे दूधाचे प्रमाण वाढवते. मुलांच्या मेंदुचा विकास होतो. हे ग्रिल किंवा बेक करुन खावे.
अंडी
यातील फोलेट आणि व्हिटॅमिन डी मुळे बाळाची ब्रेन पॉवर वाढते. हाडे मजबूत होतात. नाष्ट्यात उकडलेले अंडे खावे.
पालक
यामधील अँटीऑक्सीडेंट्स, आयर्न हे बाळांतपणानंतर रक्ताची कमतरता दूर करते. एक ग्लास पालक ज्यूस प्यावे किंवा पालकची भाजी खावी.
ओट्स
यातील आयर्न आणि फायबरमुळे आई आणि बाळाला पोटाची समस्या होत नाही. नाष्ट्यामध्ये एक वाटी ओट्स खावे. तसेच दूध प्यावे.
बटाटे
हे खाल्ल्याने आई आणि बाळ दोघांनाही उर्जा मिळते. उकळून किंवा ग्रिल करुन खावे.
दलिया
यातील आयर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते. सकाळ-संध्याकाळ एक वाटी दलिया खावे.
नारळ पाणी
यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड्समुळे आई आणि बाळ दोघांची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
बदाम
यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे मातेचे दूध वाढते. नाष्टात मुठभर बदाम दूधासोबत घ्यावे.
तिळ
यातील कॅल्शियममुळे आई आणि बाळाची हाडे मजबूत होतात. रोज दोन चमचे तिळ खावेत.
मसुर डाळ
यातील प्रोटीनमुळे दूधाचे प्रमाण वाढते. रोज एक वाटी मसूरची डाळ लाभदायक आहे.